DDA Recruitment 2025 : दिल्ली विकास प्राधिकरणात युवकांना नोकरीची संधी, अर्ज कसा करायचा, पगार किती?
DDA Recruitment 2025, How to Application for DDA : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) मध्ये कनिष्ठ अभियंतासह विविध पदांसाठी मेगा भरती केली जात आहे. प्राधिकरणाच्या वतीने भरती प्रक्रियेविषयी घोषणा करण्यात आली आहे.
उमेदवार DDA dda.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीत सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांचा अभ्यास केलेल्या होतकरु तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी आहे. या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी संबंधित क्षेत्रात BE, BTech पदवीधारक असणे अनिवार्य असणार आहे.

DDA भरती 2025 : अर्ज कसा करावा
- अधिकृत वेबसाइट dda.gov.in ला भेट द्या.
- वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या "ऑनलाइन अर्ज" लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
- त्याची प्रिंटआउट घ्या.
DDA 2025 : निवड प्रक्रिया कशी असेल?
- संगणक आधारित चाचणी (CBT) घेतली जाणार आहे. ज्यामध्ये खालीप्रमाणे
- सामान्य ज्ञान, तांत्रिक विषय आणि तर्क इत्यादी विषयावर प्रश्न विचारले जातील.
- कौशल्य चाचणी - आवश्यक पदानुसार.
- दस्तऐवज पडताळणी - ज्यामध्ये सर्व प्रमाणपत्रे तपासली जातील.
पात्रता, पगार किती मिळणार?
- अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे आहे.
- 27 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
- राखीव श्रेणींना नियमांनुसार सूट दिली जाईल.
- पगाराबद्दल बोलायचे झाले तर, वेतन पातळी - 6 नुसार लागू असेल.
- पगार 35,400 - 1,12,400 रुपये प्रति महिना असेल.
- HRA, DA, TA सारखे इतर भत्ते देखील उपलब्ध असतील.












Click it and Unblock the Notifications