Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

1 हजार नोकऱ्यांचा मार्ग मोकळा! 'या' शहरात जमीन वाटपाला मान्यता, 200 कोटींची गुंतवणूक होणार

CSN Shendra Bidkin Industrial Area : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासांदर्भातील एक मोठी अपडेट आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (AURIC) ने अनेक नवीन प्रकल्पांना भूखंड वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन गुंतवणुकीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक वाढीला मोठी चालना मिळणार आहे.

AURIC हे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ NICDC अंतर्गत विकसित केलेले भारतातील पहिले एकात्मिक ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर आहे. या नवीन गुंतवणुकींमुळे छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरातील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळून रोजगार निर्मितीलाही मदत होणार असल्याचे Ministry of Commerce & Industry कडून जारी केलेल्या पीआयबीच्या वृत्तात म्हटले आहे.

CSN Shendra Bidkin Industrial Area

जमीन वाटपाला मंजुरी

पीआयबीच्या वृत्तानुसार, AURIC ची जमीन वाटप समिती, ज्यात महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेड (MITL) आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (NICDC) चे अधिकारी सहभागी होते, त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

कोणत्या कंपनीमुळे किती रोजगार तयार होणार?

सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस: या कंपनीला मेगा प्रोजेक्ट दर्जा मिळाला असून, ती ₹ १०४ कोटींची गुंतवणूक करून विशेष अन्न घटक निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. यामुळे ३२५ पेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील.

लोनबेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड: हा देखील एक मेगा प्रोजेक्ट असून, कंपनी ₹ ११० कोटींच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रणाली (चिपसेट आणि पीसीबी) तयार करेल. यामुळे सुमारे ५०० रोजगारांची संधी निर्माण होईल.

अलंकार इंजिनिअरिंग इक्विपमेंट्स: रस्ते बांधकाम उपकरणे तयार करणाऱ्या या कंपनीला ₹१७.५० कोटींच्या गुंतवणुकीसह विस्तारासाठी भूखंड मिळाला आहे.

वरद अलॉय कास्टिंग: अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग आणि डाय कास्टिंगसाठी एक नवीन फाउंड्री स्थापन करण्याच्या उद्देशाने या कंपनीलाही विस्तारासाठी भूखंड मंजूर झाला आहे.

सु-तंत्र पेपर प्रॉडक्ट्स: कागदी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीला त्यांच्या विस्तारासाठी भूखंड देण्यात आला आहे.

मंजूर वाटपांमध्ये विशेष अन्न घटक, कागद उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, रस्ते बांधकाम उपकरणे आणि मिश्र धातु कास्टिंग यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. हे प्रकल्प एकत्रितपणे ₹२०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक यात असून आणि त्यातून अंदाजे १ हजार नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा सरकारची आहे. AURIC, जे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत विकसित झालेले भारतातील पहिले एकात्मिक ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+