मुंबई महापालिकेत नोकरी भरती, महिन्याला मिळेल लाखभर पगार, अर्जाची अंतिम तारीख कधी, वाचा सविस्तर
BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत. महापालिकेने यासंदर्भात जाहिरात काढली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. 10 मार्च 2025 पर्यंत या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोणते पद व अर्ज कसा करावा?
'बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती-2025' या भरतीतून पालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरली जात आहेत. सहायक प्राध्यापक बालरोग, क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या तीन पदांची भरती होणार आहे. या भरतीत एकूण तीन रिक्त पदे आहेत. निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस कधी असेल?
या भरतीप्रक्रियेची सुरूवात झाली आहे. 24 फेब्रुवारी 2025 पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. तर 10 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीत भाग घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची पत्ता- डिस्पॅच सेक्शन, जी-बिल्डिंग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल तळमजला, मुंबई - 400008
- पदाचे नाव- सहायक प्राध्यापक बालरोग,क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
- रिक्त पदे - 03
- अधिकृत वेबसाईट -https://portal.mcgm.gov.in/
- अर्जाची पद्धत - ऑफलाइन
- नोकरीचे ठिकाण - मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 मार्च 2025
काय असेल शैक्षणिक पात्रता?
- सहायक प्राध्यापक बालरोग- पदव्युत्तर पात्रता (M.D./D.N.B. Pediatrics).
- क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ- क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये M.A आणि पेडियाट्रिक पॅलिएटिव्ह केअरमध्ये १ वर्षाचा कामाचा अनुभव.
- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता - सोशल वर्कमध्ये मास्टर आणि पॅलिएटिव्ह केअरमध्ये १ वर्षाचा कामाचा अनुभव.
किती पगार भेटणार?
- सहायक प्राध्यापक बालरोग- १ लाख १० हजार
- क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ- ५० हजार
- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता - ३० हजार
वयाची मर्यादा किती असणार?
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तर या पदासाठी शासनाच्या वतीने वयोमर्यादा देखील घालून दिली आहे. यामध्ये 38 वर्षांपेक्षा जास्त वय असता कामा नये, असेही अर्जात सांगण्यात आले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications