कंटेट क्रिएटर्स सावधान! YouTube मॉनिटायझेशनचे नियम बदलले, जाणून घ्या सर्व काही, अन्यथा होईल नुकसान!
YouTube monetization rules Change : मोठ्या प्रमाणात युट्युबवर कंटेट क्रिएट केला जातोय. त्यावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी आता युट्युबवच्या वतीने नवीन नियम लागू केले आहेत. युट्युबवर आता मॉनिटायझेशनचे नियम कडक झाले आहेत. यूट्यूब पार्टनर प्रोग्राम (YPP) नेहमीच मूळ आणि खरा कटेंटचा प्रचार करते. त्यामुळे युट्युबवर कंटेट क्रिएट करणाऱ्यांनी यापुढे सावधान होण्याची गरज आहे. युट्युबने आता नवीन नियम काय आणले आहे, कोणत्या व्हिडिओ कंटेटवर आता पैसे मिळणार नाही, वॉचिंग टायमिंग किती असला पाहिजे, याविषयी आज आपण या लेखातून समजून घेऊया.
व्हिडीओ निर्मात्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. जे लोक YouTube वरून कंटेट तयार करून पैसे कमावतात. त्यांना यापुढे विविध नियमांचे पालन करावे लागणार आहे. कारण, युट्युब आता त्याच्या कमाईच्या धोरणात मोठा बदल करत आहे. हे नियम आता 15 जुलै 2025 पासून लागू करण्यात आले आहे.

कोणत्या प्रकारच्या व्हिडीओंना बसणार फटका?
YouTube च्या नव्या धोरणानुसार काही प्रकारचे व्हिडीओ मोनेटायझेशनसाठी अयोग्य ठरू शकतात.
जर तुम्ही दुसऱ्यांचे कंटेंट बदल न करता थेट टाकत असाल, तर ते आता मोनेटायझेशनसाठी चालणार नाही.
जसे की सतत एकाच पद्धतीने केलेले, केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले व्हिडीओ.
YouTube कडून सांगण्यात आले की, कंटेंट मनोरंजक किंवा शैक्षणिक असणे गरजेचे आहे.
YPPत सहभागी होण्यासाठी पात्रता काय?
कोणतेही चॅनल YouTube Partner Programme (YPP) मध्ये सहभागी होण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने, किमान 1,000 सबस्क्राईबर्स असणे गरजेचे आहे. तसेच मागील 12 महिन्यांत 4,000 सार्वजनिक वॉच तास किंवा मागील 90 दिवसांत 1 कोटी Shorts व्ह्यूज मिळवलेले असणे गरजेचे आहे.
नवीन नियम लागू होताच कोणावर होणार परिणाम?
काही अहवालाच्यानुसार, सद्या युट्युबने नवीन नियम लागू होताच कोणावर परिणाम होईल याविषयी काही स्पष्ट केले नाही. नवीन नियमांचं उल्लंघन केल्यास चॅनलवर काय परिणाम होतील. कोणतीही दंडात्मक कारवाई, सस्पेंशन किंवा स्ट्राइकबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिएटर्स सध्या संभ्रमात आहेतच. मात्र कंपनीच्या नव्या धोरणातून असा अंदाज लावता येतो की, एआय आधारित कंटेटवर भविष्यात अधिक काटेकोर नजर ठेवली जाऊ शकते.
१६ वर्षांखालील युझर्ससाठी नियम कठोर होणार!
विशेष बाब म्हणजे युट्युबच्या वतीने याच महिन्यात १६ वर्षांखालील युजर्ससाठीही नियम कठोर केले आहेत. आता १६ वर्षांखालील युझर्सच्या पालकांच्या देखरेखीशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास परवानगी नाही.
YouTube चे वर्षानुवर्षे जुने फीचर बंद केले जाईल
खरं तर, व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube त्यांचे वर्षानुवर्षे जुने फीचर ट्रेंडिंग पेज प्लॅटफॉर्मवरून काढून टाकत आहे. YouTube च्या या फीचरमुळे, वापरकर्त्यांना ट्रेंडिंग काय आहे हे कळू शकत होते. तसेच, निर्माते ट्रेंड शोधून त्यावर आधारित व्हिडिओ बनवत असत. ट्रेंडवर आधारित व्हिडिओ बनवल्याने अधिक व्ह्यूज मिळण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत, आता हे फीचर काढून टाकल्याने, निर्मात्यांना ट्रेंडिंग विषयांबद्दल माहिती मिळू शकणार नाही.
संक्षिप्तपणे जाणून घ्या नवीन नियमाविषयी!
YouTube चे नवीन कमाई धोरण कधीपासून लागू होईल?
१५ जुलै २०२५ पासून हे धोरण अंमलात येणार आहे.
2. कोणत्या प्रकारचे व्हिडीओ मोनेटायझेशनसाठी अपात्र ठरतील?
उचललेले, एकसंध आणि केवळ व्ह्यूजसाठी बनवलेले व्हिडीओ अपात्र ठरतील.
3. YouTube Partner Program साठी पात्रता काय आहे?
किमान १,००० सबस्क्रायबर्स आणि ४,००० वॉचिंग तास किंवा १० दशलक्ष Shorts व्यूज लागतील.












Click it and Unblock the Notifications