Infosys : 17 महिन्यांच्या मुलाने 10 कोटींहून अधिक कमाई केली, जाणून घ्या कोण आहे एकाग्र रोहन मूर्ती!
Infosys : लाखो रुपयांची कमाई करायला अनेकांची अख्खी हायात जाते. तरी देखील ती व्यक्ती कमाई करू शकत नाही. परंतु, एका 17 महिन्यांच्या मुलाने ज्याला ना सद्या बोलता येते, ना अजून नीटसे चालता येते, असा चिमुकल्याने तब्बल 10 कोटींहून अधिक कमाई केली. होय हे अगदी खरं आहे. तुम्ही म्हणाल की, हे कसे शक्य झाले. हा 17 महिन्यांचा मुलगा कोण आहे, चला तर जाणून घेऊया त्याविषयी सर्व काही.
कोण आहे एकाग्र रोहन मूर्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती व त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे 17 महिन्यांचे नातू एकाग्र रोहन मूर्ती यांना मार्च 2025 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या अंतिम लाभांशातून 3.3 कोटी रुपये मिळणार आहेत. एकाग्र नारायण मूर्ती हा कृष्णन मूर्ती व त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे.

एकाग्रकडे इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स
एकाग्रकडे इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स आहेत, जे कंपनीतील 0.04 टक्के हिस्सेदारीच्या समतुल्य आहेत. एकाग्र चार महिन्यांचा असताना, नारायण मूर्ती यांनी त्याला हे शेअर्स भेट म्हणून दिले. त्यावेळी या शेअर्सचे बाजारमूल्य 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
इन्फोसिसने अंतिम लाभांश केला जाहीर
गुरुवारी, इन्फोसिसने प्रति शेअर 22 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. आता एकाग्राकडे 15 लाख शेअर्स असल्याने, त्यांना लाभांश म्हणून 3.3 कोटी रुपये मिळतील. यासह, त्यांचे आतापर्यंतचे लाभांशापासूनचे एकूण उत्पन्न 10.65 कोटी रुपये होईल.
नोव्हेंबर 2023 मध्ये बेंगळुरू येथे जन्मलेला एकाग्र रोहन मूर्ती हा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा तिसरा नातू आहे. त्यांना दोन नाती देखील आहेत. त्यांची नावे कृष्णा आणि अनुष्का. अक्षता मूर्ती आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांंच्या त्या मुली आहेत.
या कुटुंबातील सदस्यांना मिळणार लाभांश
केवळ 17 महिन्यांचा असलेला एकाग्र भारतातील सर्वात तरुण करोडपतींपैकी एक मानला जातो. कंपनीचे शेअर्स भेट म्हणून मिळाल्यापासून, इन्फोसिसने प्रति शेअर 49 रुपयांच्या दराने तीन लाभांश जाहीर केले आहेत.
या आधारावर, वर्षाच्या सुरुवातीला त्यांना अंतरिम पेमेंट म्हणून 7.35 कोटी रुपये मिळाले. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याकडे कंपनीचे 3.89 लाख शेअर्स आहेत, म्हणजेच कंपनीतील 1.04 टक्के हिस्सा. त्यांना इन्फोसिसच्या अंतिम लाभांशातून 85.71 कोटी रुपये देखील मिळतील.
नारायण मूर्ती यांना किती लाभांश मिळणार?
नारायण मूर्ती यांना स्वतः 33.3 कोटी रुपये लाभांश म्हणून मिळतील, तर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना 76 कोटी रुपये मिळतील. लाभांश मिळविण्याची रेकॉर्ड तारीख 30 मे निश्चित करण्यात आली आहे आणि पेमेंट 30 जून रोजी केले जाईल.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications