Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jun Bank Close: जूनमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?, संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या

Jun Bank Close Date List 2025 : जर तुम्ही जून 2025 मध्ये बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम नियोजन करत असाल, तर प्रथम हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की, कोणत्या दिवशी बँका बंद राहतील. यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल आणि कोणतीही होणारी गैरसोय तुम्हाला टाळता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून 2025 मध्ये एकूण 13 बँक सुट्ट्या असतील, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सण तसेच दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार यांचा समावेश असेल. तर जून 2025 साठी बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे आहे, जेणेकरून तुम्ही आगाऊ नियोजन करू शकता अन् तुमचा वेळ आणि पैसा देखील वावू शकतात.

Jun Bank Close

जूनमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार

  • 1 जून (रविवार) : देशभरातील बँका बंद
  • 6 जून (शुक्रवार) : ईद-उल-अधा - तिरुवनंतपुरम आणि कोचीमध्ये बँका बंद
  • 7 जून (शनिवार) : बकरी ईद - मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू इत्यादी ३०+ शहरांमध्ये बँका बंद
  • 8 जून (रविवार) : देशभरातील बँका बंद
  • 10 जून (मंगळवार) : श्री गुरु अर्जुन देव जी शहीदी दिवस - पंजाबमध्ये बँका बंद
  • 11 जून (बुधवार) : संत गुरु कबीर जयंती - शिमला आणि गंगटोकमध्ये बँका बंद
  • 14 जून (शनिवार) : दुसरा शनिवार - सर्वत्र बँका बंद
  • 15 जून (रविवार) : देशभरातील बँका बंद
  • 22 जून (रविवार) : देशभरातील बँका बंद
  • 27 जून (शुक्रवार) : रथ यात्रा/कांग रथयात्रा - इंफाळ आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद
  • 28 जून (शनिवार) : चौथा शनिवार - देशभरातील बँका बंद
  • 29 जून (रविवार) : देशभरातील बँका बंद
  • 30 जून (सोमवार) : रेमरा नी - ऐझॉलमध्ये बँका बंद

काय करावे?

जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, जसे की रोख रक्कम जमा करणे, डीडी करणे किंवा कोणताही मोठा व्यवहार करणे, तर या तारखा लक्षात ठेवून नियोजन केल्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

(टीप: सर्व सुट्ट्या राज्यानुसार आहेत, म्हणजेच देशभरातील सर्व तारखांना बँका बंद राहणे आवश्यक नाही.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+