सावधान! 5 मे पासून 'या' फोनवर WhatsApp बंद होणार; तुमचा फोन या यादीत आहे का? पहा संपूर्ण यादी
सोशल मीडियावर व्हाट्सअॅप हे अॅप सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. जवळपास सगळ्यात स्मार्टफोनमध्ये ते असते. मात्र दरवर्षी व्हाट्सअॅप अशा फोन्सच्या माॅडेलची यादी जाहीर करते, जे खूप जुने आहेत. येत्या ५ मे पासून अनेक स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार आहे. काही फोनसाठी कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट्स देणे बंद केले आहे. ते फोन येत्या ५ मे पासून व्हाट्सअॅपला सपोर्ट करणार नाहीत.

नेमके काय झाले?
व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सोयी सुधारण्यासाठी आणि त्यांची गोपनीयता मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहे. त्यामुळे दरवर्षी ते जुन्या उपकरणांची यादी प्रसिद्ध करते जे सुरक्षित नाहीत. ज्यामध्ये अपडेटेड फीचर्स काम करणार नाहीत. कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट्स देणे बंद केले असेल. ज्या आयफोन मॉडेल्ससाठी अॅपल सुरक्षा अपडेट देत नाही, त्या मॉडेल्समध्ये डेटा चोरी किंवा व्हायरसचा धोका वाढतो. यामध्ये व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचाही समावेश आहे.
कोणत्या फोनवर व्हाट्सअॅप बंद होईल?
व्हॉट्सअॅप सर्व जुन्या मॉडेल्सवरील त्यांचा सपोर्ट काढून टाकत नाहीये. आयफोन ८ आणि आयफोन एक्स ला अजूनही व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळत राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की कंपनी या मॉडेल्सना सॉफ्टवेअर अपडेट्स देत नाहीये. त्यानुसार, येत्या काही वर्षांत या उपकरणांवर व्हॉट्सअॅप सपोर्ट उपलब्ध होणे बंद होण्याची शक्यता आहे. WhatsApp फक्त iOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर काम करेल. याचा अर्थ ज्यांच्याकडे आयफोन ५एस, आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस आहेत. त्यांच्या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. त्या लोकांना नवीन उपकरण घेण्याचा विचार करावा लागू शकतो.
व्हाट्सअॅपसाठी काय करावे?
तुम्ही दररोज व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर असा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये नवीनतम सॉफ्टवेअर असेल. तुम्ही सेकंड हँड आयफोन खरेदी करत असलात तरी सॉफ्टवेअरकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह फोन खरेदी करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला WhatsApp च्या नवीनतम वैशिष्ट्यांचा - चॅट लॉक, डिसपायरिंग मेसेज फीचर आणि प्रायव्हसी सेटिंग्जचा देखील फायदा मिळेल.












Click it and Unblock the Notifications