Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

What is Black Monday : ब्लॅक मंडे म्हणजे काय? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे? 4 मुद्यांत समजून घ्या

What is Black Monday : सोशल मीडियावर ब्लॅक मंडे ट्रेंड करत आहे... भविष्यवाणी अशी झाली की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नवीन टॅरिफमुळे सोमवारी 7 एप्रिल, 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये असे काही घडू शकते, त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराला मोठा धक्का बसेल...दोन दिवसांत जागतिक बाजारपेठेत आधीच 5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहे.

आज आपण या लेखात अमेरिकन शेअर बाजार किती कोसळला, भारतीय शेअर बाजाराची स्थिती काय आणि ती कशामुळे झाली, ब्लॅक मंडे म्हणजे काय त्याचा इतिहास आणि सध्याचे परिणाम हे पाहुया...

What is Black Monday

1. ब्लॅक मंडे अर्थात काळा सोमवार म्हणजे काय?

शेअर बाजार अचानक कोसळलेला दिवस म्हणजे काळा सोमवार. यापुर्वी 19 ऑक्टोबर 1987 रोजी शेअर बाजार कोसळला होता. तो सर्वात जास्त अंकांनी कोसळला तो दिवस सोमवारचा होता. कारण रविवारी साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी शेअरबाजार उघडत असतो आणि नवीन निर्देशांकाची नोंद त्या दिवशी होते. जेव्हा अमेरिकेचा डाऊ जोन्स 508 अंकांनी घसरला होता, जी 22.6 टक्क्यांची घसरण होती. त्यादिवशी जगभरातील बाजारपेठांमध्ये विध्वंस झाला होता. हाँगकाँगपासून लंडनपर्यंत सर्व काही बुडाले होते. त्या वेळी संगणक व्यापारातही डबघाई आली होती.

2. आता अमेरिकन शेअर बाजार किती कोसळला?

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका जगालाच नाही तर अमेरिकेलाही बसत आहे. गेल्या दोन दिवसांत अमेरिकन शेअर बाजार जवळपास 9 टक्क्यांनी घसरला आहे आणि गुंतवणूकदारांचे तब्बल 5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

3. तेव्हाच्या ब्लॅक मंडेशी आजचा संबंध काय?

1987 चा काळा सोमवार हा शेअर बाजाराच्या इतिहासातील एक अतिशय नुकसानकारक दिवस ठरला होता. त्या दिवसाला आज जोडण्याचे कारण म्हणजे आज सोमवार असून अमेरिकी शेअर बाजार धडाम् कोसळला आहे. सुमारे नऊ टक्क्यांनी शेअर बाजार कोसळला आहे. ही खूप मोठी घसरण आहे.. त्यामुळे तेव्हा बावीस टक्के घसरणीसारखाच आताही नऊ टक्के म्हणजेच खूप मोठा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे. निर्देशांक अजून किती कोसळतो तो दुप्पट होता का..याची चर्चा आहे.

4. ..यामुळे ब्लॅक मंडे होतोय ट्रेंड

1987 चा काळा सोमवार आताच्या काळाशी जोडल्यास, ट्रम्प यांनी लादलेल्या 10 टक्के बेसलाइन टॅरिफ आणि चीनवर 54 टक्के आणि भारतावर 26 टक्के लादलेल्या टॅरीफमुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. आणि लोकांना भीती वाटते की इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? त्यातच जागतिक बाजारात एकाच दिवसांत 5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ट्रम्प यांनी आपल्या मित्र देशांना सूट दिली नाही तर जागतिक व्यापार बिघडेल आणि सोमवारी बाजार आणखी खाली जाऊ शकतो, असे लोक म्हणत आहेत, म्हणुनच ब्लॅकमंडे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

सोशल मीडियावर ब्लॅक मंडे का होतोय ट्रेंड?

1987 चा काळा सोमवार आताच्या काळाशी जोडल्यास, ट्रम्प यांनी लादलेल्या 10 टक्के बेसलाइन टॅरिफ आणि चीनवर 54 टक्के आणि भारतावर 26 टक्के लादलेल्या टॅरीफमुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. आणि लोकांना भीती वाटते की इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? असे वाटत असल्याने ब्लॅक मंडे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

ब्लॅक मंडेचा इतिहास काय?

19 ऑक्टोबर 1987 रोजी शेअर बाजार कोसळला होता. तो सर्वात जास्त अंकांनी कोसळला तो दिवस सोमवारचा होता. कारण रविवारी साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी शेअरबाजार उघडत असतो आणि नवीन निर्देशांकाची नोंद त्या दिवशी होते. जेव्हा अमेरिकेचा डाऊ जोन्स 508 अंकांनी घसरला होता, जी 22.6 टक्क्यांची घसरण होती. त्यादिवशी जगभरातील बाजारपेठांमध्ये विध्वंस झाला होता.

1. ब्लॅक मंडे म्हणजे काय?

शेअर बाजार अचानक कोसळलेला दिवस म्हणजे काळा सोमवार.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+