Vodafone-Idea ने लॉन्च केले दोन बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन, जाणून काय आहेत फायदे
तुम्हीही जर Vodafone-Idea (VI) सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दूरसंचार कंपनी Vodafone-Idea ने आपल्या प्रीपेड योजनांचा विस्तार करत दोन नवीन बजेट-फ्रेंडली प्लॅन लॉन्च केले आहेत. जे 150 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरम्यान हा प्लॅन काही ठराविक दूरसंचार सर्कलसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी परवडणारा पर्याय देण्याच्या उद्देशाने हा प्लॅन सादर करण्यात आला आहे.

कंपनी आपल्या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि मोफत एसएमएससह इतर अनेक फायदे देखील देत आहे. तर चला मग आम्ही तुम्हाला या प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे जाणून घेऊया.
128 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vodafone-Idea च्या 128 रुपयांच्या नवीन प्लॅनची वैधता 18 दिवसांची आहे. या बजेट फ्रेंडली प्लॅनमध्ये परवडणारा डेटा पर्याय उपलब्ध आहे. या प्लॅनअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना 100MB इंटरनेट डेटा ऑफर करते, जे ब्राउझिंग आणि चालता फिरता कनेक्टिव्हिटीसाठी फायदेशीर राहिलं.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कॉलसाठी ग्राहकांना 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. तसेच 10 ऑन-नेट नाईट मिनिटे देखील मिळतील, जे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वापरले जाऊ शकतात. दरम्यान या प्लॅनमध्ये दररोज एसएमएस आणि ओटीटी सबस्क्रिप्शनची सुविधा नाही.
138 रुपये प्रीपेड
Vodafone Idea चा Rs 138 प्रीपेड प्लॅन अत्यंत परवडणारा आहे. हा प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 100MB डेटा आणि 10 लोकल ऑन-नेट नाईट मिनिटांचा समावेश आहे. याचा वापर ग्राहकांना रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत केला जाऊ शकतो.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क लागू आहे. तसेच या प्लॅनमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन आणि एसएमएस सुविधा उपलब्ध नाहीत. हा प्लॅन ज्या ग्राहकांना कमी खर्चात अत्यावश्यक सेवांचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications