Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खुशखबर! आता इंटरनेट नसतानाही होणार UPI पेमेंट! या सरकारी बँकेने आणली 'लय भारी' फायद्याची सेवा

UPI 123Pay IOB Launches : रोख रक्कम (Cash) सोबत घेऊन फिरण्याची चिंता आता पूर्णपणे संपणार आहे! ऑनलाईन पेमेंटच्या युगात, इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार शक्य आहे का? याचे उत्तर आता 'होय' आहे. सरकारी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेने ग्राहकांसाठी 'UPI 123Pay' ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सेवेमुळे फीचर फोन (Keypad Phone) वापरकर्ते आता इंटरनेट नसतानाही डिजिटल पेमेंट करू शकतील.

UPI 123Pay IOB Launches

UPI 123Pay ची वैशिष्ट्ये आणि ती कशी कार्य करेल?

आयओबीची ही नवीन सेवा खास करून ग्रामीण भागातील आणि फीचर फोन वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे. UPI 123Pay खालीलप्रमाणे काम करते.

UPI 123Pay: कार्यप्रणालीची माहिती

  • इंटरनेटची गरज नाही : (विशेषतः फीचर फोन वापरकर्त्यांसाठी).
  • व्यवहाराची पद्धत : मिस्ड कॉल आणि IVR कॉलद्वारे.

३. इंटनेटशिवाय व्यवहार कसा करायचा, व्यवहार पायऱ्या

  • पायरी १: ग्राहकाला एका विशिष्ट नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
  • पायरी २: बँक लगेच ग्राहकाला परत IVR कॉल (कॉल बॅक) करेल.
  • पायरी ३: ग्राहक व्हॉईस इंस्ट्रक्शन (आवाजाद्वारे सूचना) किंवा कीपॅड वापरून पेमेंटची रक्कम आणि UPI पिन प्रविष्ट करू शकतो.
  • ४. योग्य UPI पिन टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.

ग्रामीण आणि छोट्या शहरांना मोठा फायदा

  • देशात आजही सुमारे ८५० दशलक्ष लोक डिजिटल पेमेंट वापरत नाहीत, त्यापैकी सुमारे ४०० दशलक्ष लोक फीचर फोन वापरतात.
  • ही सेवा विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आता इंटरनेट कनेक्शन नसतानाही या भागातील लोक डिजिटल व्यवहार करू शकतील.

उपलब्ध सुविधा आणि भाषा पर्याय

  • या सेवेद्वारे केवळ पेमेंटच नव्हे, तर ग्राहक आपली बँक शिल्लक तपासू शकतो, मागील पाच व्यवहार (Five Transactions) पाहू शकतो, UPI पिन बदलू शकतो आणि तक्रारही नोंदवू शकतो.
  • भाषेची अडचण येऊ नये म्हणून UPI 123Pay सुविधा १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
  • इंडियन ओव्हरसीज बँकने ही सेवा लागू करण्यासाठी नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजी लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे. ही सुविधा MissCallPay टेक्नॉलॉजी अंतर्गत तयार करण्यात आली आहे.
  • इंडियन ओव्हरसीज बँकेचा हा उपक्रम देशातील डिजिटल आर्थिक समावेशनाला बळ देईल आणि भारताला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे एक पाऊल पुढे घेऊन जाईल.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+