काय सांगताय! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, सातत्याने भाववाढ अन् अचानक सोने चांदी का झाले स्वस्त!
सोने आणि चांदीच्या किमतीत आजच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामध्ये सोन्याला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. एकीकडे सातत्याने सोन्याच्या किमती वाढत असताना अचानक शुक्रवारी सोने चांदीच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या सविस्तर.
कोणत्या शहरात कशी झाली किमतीत घसरण?
मागणी कमी असल्याने, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 700 रुपयांनी घसरून 88,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही किंमत त्याच्या सर्वकालीन विक्रमी उच्चांकावरून खाली आली आहे. त्याच वेळी, चांदीमध्येही घसरण झाली परंतु त्याचा परिणाम सोन्याच्या तुलनेत कमी होता. गुरुवारी, 99.9% शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 89,450 रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले.

चांदीची स्थिती काय होती?
काही माध्यमांशी बोलताना सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, ज्वेलर्सकडून मागणी कमी असल्याने 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किमतीत 700 रुपयांची घसरण झाली. यामुळे हे सोने प्रति 10 ग्रॅम 88,350 रुपये राहिले. कमकुवत जागतिक ट्रेंडमुळेही घसरण झाली. स्थानिक बाजारातही चांदीच्या किमतीत घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा भाव 300 रुपयांनी घसरून 1 लाख रुपये प्रति किलो झाला. गुरुवारी चांदीचा भाव 1 लाख तीनशे रुपये प्रति किलो होता.
MCX वरही घसरण दिसून आली
फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये, एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याच्या कराराची किंमत २२५ रुपयांनी घसरून ८५,७९९ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. त्याच वेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव २८३ रुपयांनी घसरून ९६,८३० रुपये प्रति किलो झाला.
पुढे कशी असेल परिस्थिती?
'सोन्याच्या किमती कमकुवत आणि चढ-उतार असलेल्या राहिल्या. एमसीएक्सवर सोन्याचा भाव ८५,९००-८५,४०० रुपयांच्या आत राहिला तर डॉलर निर्देशांक स्थिर राहिल्यानंतरही रुपयाच्या कमकुवतपणामुळे सोन्याचा भाव ८५,३५० रुपयांच्या वर राहिला. बाजारातील सहभागी आगामी उत्पादन, सेवा आणि सध्याच्या देशांतर्गत विक्री डेटावर लक्ष केंद्रित करतील. यामुळे सोन्याच्या किमतीत अस्थिरता वाढू शकते, असे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.
घसरण का झाली?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले की, शुक्रवारी सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून घसरल्या. मौल्यवान धातूंमध्ये दीर्घकाळ चाललेल्या तेजीनंतर व्यापाऱ्यांनी नफा बुक केल्याने हे घडले.












Click it and Unblock the Notifications