Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Today gold Rate: सोन्याच्या किमती घसरल्या, किती स्वस्त झाले? तुमच्या शहरातील भाव घ्या जाणून

Today Gold Rate on 15 may 2025 : देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आज दिनांक 15 मे रोजी सोन्या चांदीचे भावासंदर्भात अपडेट समोर आली आहे. एमसीएक्सवर सकाळी सोन्या चांदीच्या दराबाबत अपडेट समोर आली आहे. त्यानुसार बऱ्याच शहरांमध्ये सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार परिस्थिती सुधारल्यामुळे आणि भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता निवळल्यामुळे गुंतवणूकदार अधिक जोखीम असलेल्या शेअर बाजाराकडे पुन्हा वळले आहेत. ज्याचा परिणाम आता सोने चांदीच्या किमतीत देखील पाहायला मिळत आहे.

आज सकाळी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर घसरले. एमसीएक्स गोल्ड जून 5 चा करार सकाळी 9.10 वाजता 0.70 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 91,615 वर आला. मागील सत्रात तो सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरून ₹ 92,265 /10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अधिकृत वेबसाइटवरून असे दिसून आले की, एमसीएक्स गोल्ड इंडेक्स ₹ 91558/10 ग्रॅम होता. दरम्यान, एमसीएक्स चांदीचे दर ₹ 94,425/किलो होते.

Today Gold and Silver Rate

शहरनिहाय सोन्या चांदीचे दर घ्या जाणून...!

दिल्लीमध्ये सोने आणि चांदीचे दर

नवी दिल्लीमध्ये सोने आणि चांदीचे दर - ₹९१,६००/१० ग्रॅम.
नवी दिल्लीमध्ये एमसीएक्स सोन्याचे दर - ₹९१,५५८/१० ग्रॅम.
नवी दिल्लीत चांदीचा दर - ₹९४,२००/किलो.
नवी दिल्लीत MCX चांदीचा दर - ₹९४,४२५/किलो.

मुंबईतील सोने आणि चांदीचे दर - १५ मे

  • मुंबईतील सोने आणि चांदीचे दर - ₹९१,७००/१० ग्रॅम.
  • मुंबईतील MCX सोने आणि चांदीचे दर - ₹९१,५५८/१० ग्रॅम.
  • मुंबईतील चांदीचा दर - ₹९४,३३०/किलो.
  • मुंबईतील MCX चांदीचा दर - ₹९४,४२५/किलो.

बेंगळुरूतील सोने आणि चांदीचे दर - १५ मे

  • बेंगळुरूतील सोने आणि चांदीचे दर - ₹९१,७८०/१० ग्रॅम.
  • बेंगळुरूतील MCX सोने आणि चांदीचे दर - ₹९१,५५८/१० ग्रॅम.
  • बेंगळुरूतील चांदीचा दर - ₹९४,४००/किलो.
  • बेंगळुरूमध्ये MCX चांदी 999 चा दर - ₹94,425/किलो.

चेन्नईमध्ये सोने आणि चांदीचे दर - 15 मे

  • चेन्नईमध्ये सोन्याचे दर - ₹91,880/10 ग्रॅम.
  • चेन्नईमध्ये MCX सोन्याचे दर - ₹91,558/10 ग्रॅम.
  • चेन्नईमध्ये चांदीचे दर - ₹94,590/किलो.
  • चेन्नईमध्ये MCX चांदी 999 चा दर - ₹94,425/किलो.

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट १८ कॅरेट

  • चेन्नई - ₹८,६१० - ₹९,३९३ - ₹७,०९५
  • मुंबई ₹8,610 ₹9,393 ₹7,045
  • दिल्ली ₹८,६२५ ₹९,४०८ ₹७,०५७
  • कोलकाता ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • बंगलोर ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • हैदराबाद ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • केरळ ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • पुणे ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • वडोदरा ₹८,६१५ ₹९,३९८ ₹७,०४९
  • अहमदाबाद ₹८,६१५ ₹९,३९८ ₹७,०४९
  • जयपूर ₹8,625 ₹9,408 ₹7,057
  • लखनौ ₹८,६२५ ₹९,४०८ ₹७,०५७
  • कोइम्बतूर ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०९५
  • मदुराई ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०९५
  • विजयवाडा - ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • पटना - ₹८,६१५ ₹९,३९८ ₹७,०४९
  • नागपूर - ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५
  • चंदीगड ₹८,६२५ ₹९,४०८ ₹७,०५७
  • सुरत ₹८,६१५ ₹९,३९८ ₹७,०४९
  • भुवनेश्वर ₹८,६१० ₹९,३९३ ₹७,०४५

मिस्ड कॉल द्या अन् सोन्या चांदीचे भाव जाणून घ्या?

तुम्ही स्वतः सोन्याचे नवीनतम दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस त्वरीत पाठवला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+