Gold price today : सोन्याची भरारी! प्रति तोळा ₹1.55 लाखांवर; चांदीनेही ओलांडला ₹2.45 लाखांचा टप्पा!
Gold price today 19 February 2026 : जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ नोंदवत सोन्याने एकाच दिवसात ३,१५१ रुपयांची झेप घेतली आहे.

आजचे ताजे दर!
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, आज बाजारपेठेतील स्थिती खालीलप्रमाणे आहे.
- सोने (२४ कॅरेट) : प्रति १० ग्रॅम ₹१,५५,७४१ (₹३,१५१ ने वाढ)
- चांदी (१ किलो) : प्रति किलो ₹२,४५,८६० (₹८,४३२ ने वाढ)
या वर्षात (२०२६) आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 21,540 रुपयांची, तर चांदीमध्ये 14,810 रुपयांची वाढ झाली आहे. 29 जानेवारी 2026 रोजी सोन्याने ₹1.76 लाख आणि चांदीने ₹3.86 लाखांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.
शहरांनुसार सोन्याचे दर का बदलतात?
अनेकदा ग्राहकांना प्रश्न पडतो की, एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांत सोन्याचे भाव वेगवेगळे का असतात? याची मुख्य ४ कारणे खालीलप्रमाणे आहेत.
वाहतूक आणि सुरक्षा खर्च: सोने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी विमा, सशस्त्र सुरक्षा आणि इंधनाचा मोठा खर्च येतो. आयात केंद्रांपासून (उदा. मुंबई) शहर जितके लांब, तितका खर्च जास्त.
खरेदीचे प्रमाण : दक्षिण भारतात सोन्याचा वापर सर्वाधिक (४०%) आहे. तेथील ज्वेलर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने त्यांना मिळणाऱ्या सवलतीचा फायदा ग्राहकांना मिळतो.
स्थानिक ज्वेलरी असोसिएशन : प्रत्येक शहराचे स्वतःचे असोसिएशन (उदा. मद्रास ज्वेलर्स असोसिएशन) असते, जे स्थानिक मागणी-पुरवठ्यानुसार दर निश्चित करतात.
जुना साठा : ज्या ज्वेलर्सकडे कमी किमतीत खरेदी केलेला जुना साठा असतो, ते ग्राहकांना स्पर्धात्मक दर देऊ शकतात.
सोने खरेदी करताना या 2 गोष्टींची काळजी घ्या
गुंतवणूक किंवा दागिन्यांसाठी सोने खरेदी करत असाल, तर फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी तपासा:
BIS हॉलमार्क : नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी करा. दागिन्यांवर 'AZ4524' सारखा अल्फान्यूमेरिक कोड असतो, जो सोन्याची शुद्धता आणि कॅरेट दर्शवतो.
दरांची पडताळणी : खरेदी करण्यापूर्वी IBJA च्या अधिकृत वेबसाईटवर २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर तपासा. वजनात पारदर्शकता असल्याची खात्री करा.
चांदी खरी की खोटी? ओळखण्याचे सोपे मार्ग
चांदीची शुद्धता तपासण्यासाठी घरीच करता येतील अशा ४ सोप्या चाचण्या:
- चाचणी : पद्धत : निष्कर्ष
- मॅग्नेट टेस्ट : चुंबक जवळ न्या : खरी चांदी चुंबकाला चिकटत नाही.
- आईस टेस्ट : चांदीवर बर्फाचा खडा ठेवा : खऱ्या चांदीवर बर्फ अत्यंत वेगाने वितळतो.
- स्मेल टेस्ट : चांदीचा वास घ्या : खऱ्या चांदीला कोणताही वास नसतो. (बनावट चांदीला तांब्याचा वास येतो).
- क्लॉथ टेस्ट : पांढऱ्या कपड्याने घासा : जर कपड्यावर काळा डाग आला, तर ती खरी चांदी आहे.












Click it and Unblock the Notifications