Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रानंतर भारतातील 'हे' राज्य पाकिस्तानवर भारी! पाकड्यांच्या GDT लाही टाकले मागे! जाणून घ्या

Tamil nadu gross state domestic product is nearly equal to pakistans gdp : सिंदूर ऑपरेशननंतर भारताची ताकद काय आहे याचा पुन्हा एकदा पाकिस्तानला प्रत्यय आला आहे. केवळ लष्करीच नाही तर आर्थिकदृष्ट्याही भारत किती शक्तिशाली आहे हेही पाकिस्तानला समजले आहे. पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघाकडे कटोरा घेऊन भीक मागावी लागली, त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था काय आहे हे समजून येते.

अलिकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा तुलना झाली. कधी लष्करी सामर्थ्यावरुन तर कधी क्रिकेट सामन्यावरुन..सर्वच बाबतीत पाकिस्तानवर भारत सरस ठरतो हे वारंवार दिसून आले आहे. भारत अनेक बाबतीत पाकिस्तानपेक्षा पुढे आहे, मग तो देशाची अर्थव्यवस्था असो किंवा संरक्षण क्षेत्रातील ताकद असो. महाराष्ट्र आणि तामिळनाडू अशी राज्य आहेत जी पाकिस्तानला पुरुन उरतात आणि भारीही ठरतात.

Tamil nadu gross state domestic product is n

अलिकडच्या काळात तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला मोठी मान्यता मिळाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, तामिळनाडूचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे ₹31.55 लाख कोटी (सुमारे $419.74 अब्ज) पर्यंत पोहोचेल.

तामिळनाडूचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन अर्थात जीएसडीपी हा पाकिस्तानच्या GDP तुलनेत जास्त आहे. पाकिस्तानचा जीडीपी $397.58 अब्ज इतका आहे.

तामिळनाडूचे एकूण राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पन्न

गुड रिटर्न्स डाॅट काॅमनुसार तमिळनाडूचा जीडीपी दक्षिण आशियात आर्थिक स्थिरता असल्याचे देखील दर्शवितो. एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था तामिळनाडू आणि महाराष्ट्रासारख्या भारतीय राज्यांपेक्षा पुढे होती. पण आता, तामिळनाडूच्या आर्थिक वाढीने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

महाराष्ट्रातील उद्योग असो की तामिळनाडूची प्रगती त्याच्या मजबूत औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांमुळे, निर्यात-केंद्रित धोरणांमुळे आणि विविध गुंतवणूकीमुळे झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, अलीकडेच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून आर्थिक मदत घ्यावी लागली आणि त्याचे परकीय कर्ज त्याच्या GDP च्या सुमारे 42 टक्के आहे अशी बातमीही समोर आली, म्हणजेच जेवढा जीडीपी त्याच्या निम्म्याच्या आसपास पाकिस्तानने कर्ज घेतलेले आहे.

Tamil nadu gross state domestic product is n

2004-05 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी किती होता?

2004-05 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी सुमारे 132 अब्ज डॉलर्स होता. तामिळनाडूचा जीएसडीपी 48 अब्ज डॉलर्स होता, जो पाकिस्तानच्या जीडीपीच्या सुमारे 37% होता आणि महाराष्ट्राचा जीएसडीपी 92 अब्ज डॉलर्स होता, जो पाकिस्तानच्या जीडीपीच्या सुमारे 69% होता. 2023-24 पर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली. पाकिस्तानचा जीडीपी आता 338 अब्ज डॉलर्स आहे. त्याचवेळी, तामिळनाडूचा जीएसडीपी वेगाने वाढून $329 अब्ज झाला.

महाराष्ट्र देशात अन् पाकिस्तानलाही भारीच...!

तामिळनाडू वगळता, महाराष्ट्राचा जीएसडीपी 490 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे, जो पाकिस्तानपेक्षा खूपच जास्त आहे आणि आज पाकिस्तानचा जीडीपी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या फक्त 69% आहे. तर दोन दशकांपूर्वी पाकिस्तानचा जीडीपी महाराष्ट्रापेक्षा सुमारे 1.5 पट जास्त होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+