Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वतःचं घर घ्यायचंय? लवकर घ्या... 'या' बँकेने खपाखप कमी केलाय व्याजदर; किती होईल फायदा? वाचा

देशातील मध्यवर्ती बँक समजल्या जाणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता इतर बँकांनाही त्यांच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन ओव्हरसीज बँकेने रेपो रेटशी जोडलेले व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेने शनिवारी ही माहिती दिली. बँकेच्या या निर्णयानंतर ग्राहकांना स्वस्त दरात गृहकर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Home loans have become cheaper

आरबीआयचे व्याजदर झाले कमी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची चलनविषयक धोरण समितीची (MPC) नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पॉलिसी रेट रेपो 6.25 टक्क्यांवरून सहा टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता इंडियन ओव्हरसीज बँकेनेही व्याजदर कमी केला आहे. व्याजदरात कपात झाल्यामुळे गृहकर्जासह या बँकेकडून घेतलेल्या सर्व कर्जांचा ईएमआय कमी होईल.

गृहकर्ज होणार स्वस्त

बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर आता या बँकेकडून गृहकर्ज स्वस्त होणार आहे. जर कोणी या सरकारी बँकेकडून कर्जासाठी अर्ज केला तर त्याला कमी ईएमआय भरावा लागेल. गृहकर्जाव्यतिरिक्त इतर कर्जे देखील आता स्वस्त होतील, असा अंदाज आहे. परंतु सध्यातरी ज्यांना स्वतःचे घर घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

का झाली व्यादरात कपात?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतीय वस्तूंच्या आयातीवर २६ टक्के शुल्क जाहीर केल्यानंतर वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आरबीआयने व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर देशातील इतर सरकारी बँकाही त्यांचा व्याजदर कमी करत आहेत.

आता किती असेल व्याज?

इंडियन ओव्हरसीज बँक ही एक सरकारी बँक आहे, बँकेने रेपो लिंक्ड कर्जांवरील व्याजदर ०.२५ टक्के कमी करून ९.१० टक्क्यांवरून ८.८५ टक्के केला आहे. ही कपात १२ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. म्हणजेच आजपासून बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लोकांचा ईएमआय कमी होईल. त्यांना व्याज म्हणून कमी रक्कम द्यावी लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+