भारतात लवकरच starlink इंटरनेट सेवा मिळणार; मस्कच्या कंपनीला मंत्रालयाची मान्यता, किती लागणार पैसे?
Elon Musk and Star Link in India : अमेरिकेचे उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्यासाठी दूरसंचार विभागाची मंजुरी मिळाली आहे. आता त्यांना फक्त भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रमोशन आणि अधिकृतता केंद्र म्हणजेच IN-SPACE कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात आता इंटरनेट सेवेमध्ये अधिक क्रांती होणार असल्याचे बोलले जात आहे. तर जिओ सारख्या कंपनीला देखील स्पर्धक उपलब्ध असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्याचा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. यापूर्वी, भारतीच्या वनवेब आणि रिलायन्स जिओला देशात त्यांच्या सेवा पुरवण्यास मान्यता देण्यात आली होती.

स्टारलिंकच्या प्रमोशनल प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा
'द इकॉनॉमिक टाईम्स'मधील एका वृत्तानुसार, स्पेसएक्स भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. ज्याची किंमत दरमहा 10 डॉलर्सपेक्षा कमी किंवा सुमारे 840 रुपये आहे. स्टारलिंकसह उपग्रह संप्रेषण कंपन्यांचे लक्ष्य त्यांचा वापरकर्ता आधार वेगाने वाढवणे आहे. मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत ते 1 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे कंपन्यांना स्पेक्ट्रमचा मोठा खर्च भरून काढण्यास मदत होईल.
उपग्रहांमधून इंटरनेट कसे पोहोचेल?
उपग्रहांमुळे पृथ्वीच्या कोणत्याही भागातून बीम इंटरनेट कव्हरेज शक्य होते. वापरकर्त्यांना उपग्रहांच्या नेटवर्कमधून हाय-स्पीड, कमी-लेटन्सी इंटरनेट कव्हरेज मिळते. लेटन्सी म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूवर डेटा प्रसारित करण्यासाठी लागणारा वेळ.
स्टारलिंक किटमध्ये स्टारलिंक डिश, वाय-फाय राउटर, पॉवर सप्लाय केबल्स आणि माउंटिंग ट्रायपॉड असतात. हाय-स्पीड इंटरनेटसाठी, डिश उघड्या आकाशाखाली ठेवावी लागते. स्टारलिंकचे अॅप iOS आणि Android वर उपलब्ध आहे, जे सेटअपपासून ते देखरेखीपर्यंत सर्व काही करते.












Click it and Unblock the Notifications