Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

1 September rules change: स्वस्त होऊ शकतो विमानप्रवास! आजपासून 'हे' महत्वाचे बदल..जाणून घ्या

1 September rules change: आज एक सप्टेंबर..आजपासून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला मोठी झळही बसणार आहे. या बदलांत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतील 39 रुपयांनी दर वाढले आहेत. तर आजपासून क्रेडिट कार्डचे नवीन नियम लागू होतील तसंच विमानप्रवासही स्वस्त होऊ शकतो.

आजपासून कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या आर्थिक गोष्टींसह खिशावर किती परिणाम होईल? हे जाणून घेऊया.

September 1 Rule Change Aadhaar Update Date Extended No Change in Fuel Petrol Rates

व्यावसायिक सिलेंडर 39 रुपयांनी महाग

एलपीजी सिलिंडरच्या किमती सरकार दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजीच्या किमतीत सुधारणा करते. यामध्ये व्यावसायिक आणि एलपीजी दोन्ही सिलिंडरचा समावेश आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 8.50 रुपयांनी वाढले होते, तर जुलैमध्ये 30 रुपयांनी घसरले होते. आज मात्र, व्यावसायिक सिलिंडरचे दर 39 रुपयांनी वाढले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आधार कार्ड अपडेटची तारीख वाढवली...

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर ठरली आहे. या तारखेनंतर, तुमच्या आधार कार्डवर काही तपशील अपडेट केल्यास पन्नास रुपये शुल्क आकारले जाईल. ही अंतिम मुदत सुरुवातीला 14 जूनसाठी होती, परंतु मोफत अपडेट करण्याला अधिक वेळ देण्यासाठी ती वाढवण्यात आली होती.

हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो

तेल विपणन कंपन्यांनी महानगरांमध्ये एटीएफच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीतील एटीएफ 4,495.50 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 93,480.22 रुपये प्रति किलोलिटर (1000 लिटर) झाले आहे. तर चेन्नईमध्ये एटीएफ 4,567.76 रुपयांनी स्वस्त झाला असून ते 97,064.32 रुपये प्रति किलोलिटर झाला आहे.

कोलकातामध्ये, एटीएफ 100520.88 रुपये प्रति किलोलिटर दराने उपलब्ध होते, आता ते 4,222.44 रुपयांनी स्वस्त होईल आणि 96,298.44 रुपयांना उपलब्ध होईल. मुंबईत ATF ची किंमत 4,217.56 रुपयांनी कमी झाली आहे. आता ते 87,432.78 रुपये प्रति किलोलिटर दराने उपलब्ध आहे.

फेक कॉल्स आणि मेसेज बंद होऊ शकतात

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने फसवणूक कॉल आणि एसएमएस घोटाळ्यांशी संबंधित सायबर गुन्हेगारी क्रियाकलाप रोखण्यासाठी आजपासून दूरसंचार नियमांमध्ये बदल लागू केले आहेत. ट्रायने Jio, Airtel सारख्या दूरसंचार कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

यामध्ये, त्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत टेलीमार्केटिंग कॉल्स आणि बिझनेस मेसेजिंग, विशेषत: 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे कॉल्स ब्लॉकचेन-आधारित वितरित लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर हलवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ट्रायच्या कठोर मार्गदर्शक सूचनांनंतर लोकांना फेक कॉल्स आणि मेसेजपासून सुटका होऊ शकते, ही अपेक्षाही आहे.

6. UPI आणि RuPay कार्ड नियम:

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन नियमांनुसार, RuPay क्रेडिट कार्ड आणि UPI व्यवहारांसाठीचे व्यवहार शुल्क यापुढे तुमच्या RuPay रिवॉर्ड पॉइंट्समधून कापले जाणार नाही. हा नियम लागू करण्यासाठी बँकांना कळवण्यात आले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल नाही

दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज म्हणजेच 1 ऑगस्टलाही कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रतिलिटर आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+