6,577 कोटी कुठे आहेत? 2000 च्या नोटासंदर्भात आरबीआयने दिली महत्वाची माहिती
Rbi Update : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या गुलाबी नोटांबाबत एक मोठी अपडेट जारी केली केलं आहे. 2000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्यानंतर 98.15 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत जमा झाल्या आहेत. आता फक्त 6,577 कोटी रुपयांच्या नोटा लोकांच्या ताब्यात आहेत.
19 मे 2023 रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. 2000 रुपायाच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर तेव्हा नोटा जमा करण्याचा वेग खूप वेगवान होता, मात्र नंतर आता हा वेग खूपच कमी झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटांबाबत जारी केलेल्या अपडेटवर नजर टाकली तर असे म्हटले आहे की 98.15 टक्के गुलाबी नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. एका महिन्यात फक्त 114 कोटी रुपयांच्या नोटा परत मिळू शकल्या. 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 6,577 कोटी रुपयांच्या या मोठ्या नोटा अजूनही बाजारात आहेत.
आरबीआयने दिली महत्वाची माहीती
आरबीआयने म्हटलं आहे की 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या एकूण 98.15 टक्के नोटा परत आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ही सुविधा अजूनही रिझर्व्ह बँकेच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
6,577 कोटी कुठे आहेत?
सध्या बाजारात 6,577 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नोटाच्या परतीची वाट पाहत आहे. क्लीन नोट धोरणांतर्गत आरबीआयने 19 मे 2023 रोजी देशातील 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या होत्या. यानंतर या नोटा परत करण्याची आणि जमा करण्याची वेळ 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निश्चित करण्यात आली होती, परंतु ही तारीख वेळोवेळी वाढवण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications