Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RBI Repo Rate: सर्वसामान्यांना तूर्त दिलासा नाही! RBI ने रेपो रेटमध्ये काय बदल केला? जाणून घ्या

RBI Repo Rate Unchanged : "तुमच्या खिशावर आणि घराच्या बजेटवर थेट परिणाम करणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) आज नवीन पतधोरण जाहीर केले असून, रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ असा की, सध्या ५.२५ टक्क्यांवर असलेला रेपो रेट तसाच राहील. आता सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की-या निर्णयामुळे माझ्या घराच्या किंवा गाडीच्या कर्जाचा हप्ता (EMI) कमी होणार का? महागाई दर निचांकी स्तरावर असतानाही आरबीआयने व्याजदरात कपात का केली नाही? सोप्या भाषेत समजून घेऊया आरबीआयच्या या निर्णयाचा तुमच्यावर होणारा परिणाम..."

RBI Repo Rate Unchanged


'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी आपले चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे, रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो रेट ५.२५ टक्के या पातळीवरच स्थिर राहणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडल्यानंतरची ही पहिलीच पतधोरण आढावा बैठक होती.

बॅंकिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, आरबीआयने आपले धोरण 'न्यूट्रल' (तटस्थ) ठेवले आहे. डिसेंबरमध्ये रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर, यावेळी आरबीआयने व्याजदरांना 'ब्रेक' लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, सध्या गृहकर्ज (Home Loan) किंवा कार लोनच्या ईएमआयमध्ये (EMI) कोणतीही कपात होण्याची शक्यता नाही.

महागाई कमी असूनही सावध पाऊल

देशातील किरकोळ महागाई दर गेल्या चार महिन्यांपासून २ टक्क्यांच्या खाली असूनही आरबीआयने व्याजदर न घटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

रुपयाची घसरण: गेल्या काही दिवसांत रुपया डॉलरच्या तुलनेत ९२ च्या पार गेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्तर आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात महाग होऊन महागाई पुन्हा वाढण्याची भीती आहे.

जागतिक परिस्थिती: जगभरातील भू-राजकीय अनिश्चितता आणि युद्धाचे ढग यामुळे आरबीआय तूर्त सावध भूमिका घेत आहे.

मजबूत अर्थव्यवस्था: देशाचा जीडीपी (GDP) वाढीचा दर ८.२ टक्के इतका मजबूत राहिल्याने आरबीआयला सध्या तरी व्याजदरात कपात करण्याची घाई नाही.

२०२५ पासून आतापर्यंत सव्वा टक्क्यांची कपात

आरबीआयने फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण १२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. जूनमध्ये सर्वाधिक ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. सध्या ५.२५ टक्के असलेला रेपो रेट हा मध्यम स्वरूपाचा मानला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+