Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ग्राहकांचं टेन्शन वाढलं! RBIचा सर्वात मोठ्या सरकारी बॅंक SBIला दणका;1.72 कोटींचा दंड, नेमकं काय घडलं

RBI penalty on SBI Bank, what is real reasons : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँका आणि एनबीएफसींना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया वेळोवेळी दंड ठोठावत असते, तर बॅंकांना नियमानुसार काम करण्याची ताकीद देत असते.

नुकताच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि जन स्मॉल फायनान्स बँकेला नियमांचे उल्लंघन केले म्हणून मोठा दंड ठोठावला आहे. बँकांच्या काही अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी, आरबीआयने इंडियन बँकेवरही अशीच कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईमुळे एसबीआयचा ग्राहक चिंतेत पडला आहे. या दंडाचा बॅंकेच्या दैनदिन व्यवहारावर काही परिणाम होणार आहे का, असा सवाल आता ग्राहकांकडून केला जात आहे.

RBI penalty on SBI Bank

एसबीआयला 1.72 कोटी रुपयांचा दंड

आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर 1.72 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्ज आणि ग्राहकांच्या दायित्वावर मर्यादा घालण्याशी संबंधित नियमांचे पालन न करणे (परवानशिवाय काही व्यवहार केले गेल्याचे दिसून येणे) आणि चालू खाती उघडण्याच्या नियमांचे पालन न करणे यासारख्या कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या लक्षात येताच ही मोठी कारवाई करण्यात आली. याआधीही आरबीआयने एसबीआयवर दंड ठोठावला होता.

जन स्मॉल फायनान्स बँकेला दंड

आरबीआयने जन स्मॉल फायनान्स बँकेवरही दंड ठोठावला आहे. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणात काय म्हणाले आरबीआय?

दोन्ही प्रकरणांमध्ये, आरबीआयने स्पष्टपणे म्हटले आहे की, बँकांच्या त्रुटींच्या आधारे दंड आकारण्यात आला आहे. तसेच, बँकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा कारवाईचा उद्देश बँकांना अधिक सतर्क करणे आणि नियमांना गांभीर्याने घेणे हा आहे.

तथापि, ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही कारण अशा दंडांचा बँकिंग सेवांवर कोणताही परिणाम होत नाही. तुमच्या सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. बँकांनी नियमांचे पालन करावे यासाठी आरबीआय वेळोवेळी अशीच कडक भूमिका घेते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+