रतन टाटांचे विश्वासू असलेले शंतनू नायडूंना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी; वाचा शंतनू यांचा प्रवास
टाटा समूहाचे माजी चेअरमन दिवंगत रतन टाटा यांच्या अतिशय जवळचे युवा मित्र अशी ओळख असलेले मित्र शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. शंतनू नायडू यांनी लिंक्डइनवर एक भावनिक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये नवीन पद स्वीकारत आहे.
काय म्हणाले शंतनू नायडू?
लिंक्डइनवरील भावनिक पोस्टमध्ये नायडू यांनी लिहिले की, 'टाटा मोटर्समध्ये मी जनरल मॅनेजर, हेड - स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून नवीन पद स्वीकारत आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे!' नायडूंसाठी वैयक्तिकरित्या ही भूमिका खूप महत्त्वाची आहे.
वडिलांचा उल्लेख करून भावनिक पोस्ट
टाटा मोटर्सशी असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या नात्याबद्दल विचार मांडताना त्यांनी लिहिले, 'मला आठवते जेव्हा माझे वडील टाटा प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी येत असत आणि मी खिडकीजवळ त्यांची वाट पाहत असे. आता संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाले आहे. त्याने टाटा नॅनोसोबतचा एक फोटोही शेअर केला.

टाटा मोटर्स ही रतन टाटांची स्वप्नातील कार होती. दुसरीकडे युझर्सकडून नायडू यांना त्यांच्या कारकिर्दीतील या मोठ्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. एका वापरकर्त्याने लिहिले, 'खूपच हृदयस्पर्शी प्रवास!' टाटा मोटर्समध्ये ही भूमिका स्वीकारल्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो अन् अभिनंदन देखील करतो.
रतन टाटांसोबत कसे नाते होते शंतनू नायडूंचे?
रतन टाटांच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक शंतनू नायडू होते, जे त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांच्यासोबत राहिले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात नायडू यांचे नाव समाविष्ट केले तेव्हा त्यांच्यातील जवळचे नाते स्पष्ट झाले.
टाटांनी नायडू यांचे शैक्षणिक कर्ज माफ केले आणि नायडू यांच्या भागीदार स्टार्टअप गुडफेलोमधील त्यांचा हिस्सा सोडला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर नायडू यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की या मैत्रीमुळे आता माझ्या आत एक पोकळी निर्माण झाली आहे, मी माझे उर्वरित आयुष्य ती भरून काढण्याचा प्रयत्न करेन.












Click it and Unblock the Notifications