Pune News : खूशखबर! खाद्यतेलाचे भाव कमी होणार! डाळी, साखर स्वस्त तर 'या' वस्तूचे दर वाढले
Pune News Edible oil prices will decrease : गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेले खाद्यतेलाचे भाव कमी होणार आहे. यासह साखर आणि डाळीही स्वस्त होणार आहे. मागणी कमी असल्याने डाळी आणि कडधान्यांच्या भावात मंदी आहे.
तर दुसरीकडे 45 रुपये किलो दराने विक्री होणारी साखरही आता कमी होण्याची चिन्हे आहेत. जून महिन्यात आवश्यकतेपेक्षा जास्त कोटा जाहीर झाल्याने साखरेच्या दरात प्रती क्विंटलमागे 50 रुपयांनी घट झाली आहे.

..म्हणून तेल होणार स्वस्त (Edible oil prices will decrease)
कच्च्या आयात तेलावरील आयातशुल्क कमी केल्यामुळे तेलाचे भाव आणखी कमी होणार असल्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात खाद्यवस्तूंची आवक मंदावते, जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीचा आलेखही या काळात घसरत असतो. यामुळे ग्राहकांची वर्दळही बाजारपेठेत तुलनेत कमी असतात. अशा स्थितीत आता लग्नसराईसुद्धा संपण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे डाळी आणि तेलाच्या किमती घसरु शकतात.
खाद्य तेलाच्या किमती कमी होण्याची मुळ कारणे काय? (Edible oil prices will decrease)
खाद्य तेलाचे दर कमी होणार असल्याबाबत प्रभातने वृत्त दिले, त्यानुसार, आयात खाद्यतेलावरील शुल्क कपात हे तेलाचे भाव कमी होण्यामागचे एक कारण आहे तर केंद्र सरकारने तेलबियांची आधारभूत किंमत दहा टक्क्यांनी कमी केली आहे, याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय तर दुसरीकडे तेलाचे शुल्क कमी होत आहे.
कधी कमी होणार खाद्यतेलाच्या किमती? (Edible oil prices will decrease)
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आयात शुल्क सध्या २७ टक्क्यांऐवजी १७ टक्के लागू होणार आहे परिणामी सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आतापेक्षाकमी होतील. या आठवड्यात जरी ठोस परिणाम दिसत नसले तरीही पुढच्या आठवड्यात तेलाचे भाव उतरताना दिसतील असेही व्यापारतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
गुळाचे भाव वाढले.. (jaggery rates increase)
मागणी कमी असल्याने साखरेच्या भावातही मंदी आहे तर, उलटपक्षी गुळाचे भाव मात्र वाढले आहेत. याला प्रमुख कारण म्हणजे मे महिन्यात कडक ऊन असणे अपेक्षित असताना पावसाचे प्रमाण जास्त होते. मागील आठ ते दहा दिवस पाऊस होता, यामुळे गुऱ्हाळे पुर्णतः बंद होती. या कालावधीत गूळ उत्पादन घटले असून गुळाची निर्यात मंद झाली मात्र मागणीत कोणतीही मंदी नाही त्यामुळे गुळाचा तुटवडा निर्माण झाल्याने गूळ दोनशे रुपये प्रतीभेल वाढला आहे.
हेही वाचा : Gold Rate : आठवडाभरात सोने किती स्वस्त झाले?, कॅरेटनुसार तुमच्या शहरात काय आहेत दर, जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications