पोस्ट ऑफिसची 'ही' भन्नाट योजना! मुलांच्या उच्च शिक्षणासाठी फायदेशीर, गुंतवणुकीवर काय आहे फायदा? वाचा
post office scheme ppf account : भारतीय टपाल खाते आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असते. या द्वारे अनेक लोक उपयोगी योजना आणून ग्राहकांचे हित जोपासत असते. मुलांच्या जन्मापासून वयोवृद्धापर्यंत हल्ली अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकी एक योजनेची आपण माहिती घेऊया.
हल्ली वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च, आरोग्याच्या समस्या आणि त्यावरील खर्चिक उपचार यासह इतर समस्यांमुळे आर्थिक प्रश्न अनेकासमोर कधी ना कधी उभे राहतात. यासह मुलांच्या शिक्षणासाठी केजी टू पीजी खर्च पाहता त्यांच्यासाठी सुरक्षित आर्थिक तरतुदीचे नियोजन करणे हल्ली क्रमप्राप्त झाले आहे.

जर तुम्ही मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेत शंभर रुपयांपासून गुंतवणूक करुन लाखांपर्यत लाभ मिळवू शकता.
टपाल खात्याची पीपीएफ योजना काय आहे?
- पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करू शकता. सरकार यावर दरवर्षी ७.१% व्याज देते आणि मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे.
- ५ व्या वर्षाच्या सुरुवातीला, तुम्ही पीपीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकता.
- ७ व्या वर्षापासून, तुम्ही पीपीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढू शकता.
- पीपीएफ खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो.
- पीपीएफ योजना १५ वर्षात परिपक्व होते. तुम्ही १५ वर्षांनंतर खातं ५ वर्षांसाठी वाढवू शकता.
कसे उघडाल पीपीएफ खाते..
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी, तुम्हाला काही कागदपत्रे आणि तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक असतील.
पीपीएफ योजना एक सुरक्षित आणि दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेत, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित व्याज मिळवू शकता आणि कर लाभ देखील घेऊ शकता.
१५ वर्षांनंतर, ही रक्कम तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, कॉलेज फी किंवा इतर गरजांसाठी वापरली जाऊ शकते. कमी बजेटमध्येही सुरक्षित गुंतवणूक हवी असलेल्या पालकांसाठी ही योजना विशेषतः फायदेशीर आहे.












Click it and Unblock the Notifications