पोस्टाच्या 'या' योजनेत 5 लाख गुंतवा अन् 2.24 लाख व्याज मिळवा, जाणून घ्या ही फाडू योजना कसा देते लाभ!
post office national saving certificate scheme : सध्या दिवसेंदिवस प्रत्येकाला आर्थिक नियोजन करताना गुंतवणूकीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक जण योग्य गुंतवणूक करण्यासाठी अनेकोपर्याय शोधत असतात.
गुंतवणूकदारांकडून बँकेत मुदत ठेव, शेअर बाजारात गुंतवणूक, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक यासारखे अनेक पर्याय निवडले जातात. अशातच, केंद्र शासनाच्या पोस्ट कार्यालयात देखील अनेक गुंतवणूकीच्या योजना देखील तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहेत.
पोस्टाच्या बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. पोस्टाची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना सुरक्षित आणि करबचतीसाठी फायदेशीर योजना मानली जाते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवलेले पैसे केवळ सुरक्षित राहत नाहीत तर त्याच्यावर निश्चित व्याज मिळतं. याचा गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा देखील मिळतो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी लागते. एकदा पाच वर्ष गुंतवणूक केल्यानंतर या योजनेतून पैसे काढता येत नाहीत. या योजनेत वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळतं. हे व्याज कम्पाऊंडिंगद्वारे दिलं जातं.
या योजनेत किमान 1000 रुपये आणि त्यापुढं 100 च्या पटीत जितकी गुंतवणूक करायची आहे तितकी करता येईल. कमाल किती रक्कम गुंतवावी याची मर्यादा नाही. म्हणजेच तुमची जितकी बचत असेल त्याच्या प्रमाणात परतावा गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
मुलाच्या नावानेही काढता येते खाते!
जर एखाद्या गुंतवणूकदाराच्या मुलाचं वय 10 वर्ष आहे, तर त्या मुलाच्या नावानं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचं खातं उघडता येईल. जर मुलाचं किंवा मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर आई वडील मुलांच्या वतीनं खातं उघडू शकतात. यामुळं मुलांना लहाणपणापासून बचत करण्याची सवय लागेल.
5 लाखांची गुंतवणूक करा अन् 2.24 लाख मिळवा!
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 7.7 टक्के चक्रवाढ व्याजदरानुसार 5 वर्षात ही रक्कम 7,24,517 रुपये इतकी होईल. तुम्हाला 5 वर्षात 2,24,517 रुपयांचं व्याज मिळेल. हे व्याज ठेव कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळेल.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी योजना आहे. प्रामुख्यानं मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची विश्वासार्ह योजना आहे. या योजनेत व्याज दरवर्षी जमा रकमेत जमा होतं. पुढील वर्षी जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळते.
पोस्ट ऑफिसमध्ये National Saving Account कसे उघडणार!
पोस्ट ऑफिसमध्ये नॅशनल सेव्हिंग अकाऊंट (National Saving Account) उघडण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल. आवश्यक कागदपत्रे जोडून ती जमा करावी लागतील. त्यानंतर, आवश्यक माहिती भरून तुम्ही खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला नॅशनल सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी अर्ज (application form) मिळेल. तो अर्ज व्यवस्थित भरा. त्यासाठी ओळखीचा पुरावा (identity proof), पत्त्याचा पुरावा (address proof), आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडा. आवश्यक असलेली किमान ठेव रक्कम जमा करा. त्यानतंर भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा. त्यानंतर तुमचे खाते उघडल्यावर तुम्हाला पासबुक मिळेल.
-
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास










Click it and Unblock the Notifications