तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी केंद्र सरकार देते 10 लाखांपर्यंत कर्ज, पीएम मुद्रा कर्ज मिळवायचं कसं..?
PM Mudra Loan : आपल्या देशात सरकारी नोकरीसाठी जो तो प्रयत्न करतो पण प्रत्येकालाच सरकारी नोकरी मिळेल याची शक्यता नसते म्हणूनच तरुणांनी नोकरीऐवजी उद्योग-व्यवसायाकडं वळावं यासाठी सरकार काही महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. आपण त्यातील PM Mudra Loan योजनवर आज जाणून घेणार आहोत.
तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी योजना
देशातील अनेक तरुणांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असतो, परंतु अनेकदा पुरेसे भांडवल नसल्यानं किंवा बेताचीच परिस्थिती असल्यानं व्यवसाय सुरु करता येत नाही मात्र, तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते हे तुम्हाला माहीतेय का..जर नसेल माहीत तर या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहोत. ज्या तरुणांना स्वतः चा व्यसाय सुरु करायचायं, त्यांना सरकार 10 लाखांपर्यंत कर्ज देतं. या योजनेत देशातील कोणताही नागरिक अर्ज करु शकतो.

तीन गटात दिले जाते पीएम मुद्रा कर्ज
पीएम मुद्रा कर्ज योजनेची सुरुवात २2015 साली सुरु करण्यात आली होती. ज्या लोकांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा आहे, त्यांनी या योजनेत अर्ज करावा लागतो. पीएम मुद्रा योजनेत तीन गटात कर्ज पुरवठा केला जातो.
पहिला गट म्हणजे शिशु कर्ज, दुसरा गट किशोर लोन आणि तिसरा गट म्हणजे तरुण गट... शिशु कर्जा अंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या योजनेत लाभ घेण्यासाठी कोणत्याही हमीची गरज नाही. किशोर लोनमध्ये तुम्ही 50 हजार ते 5 लाखांपर्यंत लोन घेऊ शकतात आणि तरुण लोन अंतर्गत तुम्ही 5 लाख ते 20 लाख रुपपांचे लोन घेऊन बिझनेस सुरु करु शकतात.
शिशू कर्ज मिळेल गॅरंटीही लागणार नाही
जर तुम्ही पीएम शिशु मुद्रा योजनेअंतर्गत लोनसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. या योजनेत अर्ज करण्यासाठीही कोणतेही शुल्क घेतले जात नाही, या योजनेत तुम्हाला 9 ते 12 टक्के व्याज द्यावे लागेल. या योजनेत लहान दुकानदार, फुल, फूड प्रोसेसिंग यूनिट अशा लहान उद्योजकांना लोन मिळते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 18 वर्षांवरील कोणताही नागरिक अर्ज करु शकतात.
येथे करा अर्ज
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची बैंक डिफॉल्ट हिस्ट्री नसावी. तसेच त्याचे बँकेत अकाउंट असायला हवे. या योजनेत तुम्ही https://www.mudra.org.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. मित्रांनो कसा वाटला हा आमचा व्हिडिओ हे कमेंटबाॅक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूबचॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.












Click it and Unblock the Notifications