PM Kisan मोठी खुशखबर! शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच 'बोनस'! PM किसान योजनेचा 21 वा हप्ता वेळेआधीच जारी
PM Kisan 21st Installment Released : नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुमचा PM किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता निर्धारित वेळेपूर्वीच खात्यात जमा झाला आहे!
हा हप्ता खास करून पूर आणि भूस्खलन ग्रस्त तीन राज्यांतील शेतकऱ्यांसाठी 'दुर्गा पूजेचा' खास सण भेट ठरला आहे. जर तुमचे खातेदार या तीन राज्यांत नसतील, तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल... पण हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, आणि तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धतही येथे दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी यावर्षी दिवाळीपूर्वीच मोठी आर्थिक मदत आली आहे. केंद्र सरकारने दुर्गा पूजा सुरू असतानाच पीएम किसानचा २१ वा हप्ता निर्धारित वेळेपूर्वी जारी केला आहे. हा हप्ता सामान्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणे अपेक्षित होते, पण यावर्षी नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो ॲडव्हान्समध्ये देण्यात आला आहे.
फक्त ३ राज्यांतील शेतकऱ्यांसाठी दिलासा
हा २१ वा हप्ता सध्या संपूर्ण देशासाठी नव्हे, तर फक्त तीन राज्यांसाठी आगाऊ (वेळेआधी) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. ज्या तीन राज्यांसाठी हा हप्ता जारी करण्यात आला आहे, ती राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडचा समावेश आहे.
तीन राज्यांना का दिला जातोय अॅडव्हान्स हप्ता, कारण काय?
या तिन्ही राज्यांनी नुकताच अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या कठीण परिस्थितीत, केंद्र सरकारने वेळेवर आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दुर्गा पूजेचा मोठा दिलासा दिला आहे.
हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना थेट लाभ
भाजप प्रदेश प्रवक्ता अखिलेश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दौऱ्यावर जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली आहे. ८०,१४५ हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹१६०.२१ कोटी रुपये हस्तांतरित (Transfer) करण्यात आले आहेत. एकूण, केंद्र सरकारने या तीन राज्यांतील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५४० कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, कसे तपासाल?
PM किसानचा हप्ता आला की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम मॅसेज (Message) तपासा: हप्ता जमा झाल्यावर सरकार आणि बँक, दोन्हीकडून शेतकऱ्याला मॅसेज पाठवला जातो. जरमॅसेज आला नसेल, तर जवळच्या ATM मध्ये जाऊन बॅलन्स तपासा किंवा बँक शाखेत पासबुकमध्ये एंट्री करून घ्या.
उर्वरित राज्यांसाठी कधी येणार हप्ता?
सध्या केवळ नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळाले असले तरी, उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांना देखील लवकरच २१ वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पण तो दिवाळीआधीच जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications