PM Kisan : मोठा धमाका! 2 हजारांचा 21 वा हप्ता 'या' दिवशी येणार? तुमचं नाव आहे की नाही असे तपासा
PM Kisan 21st Installment Date 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यात लवकरच ₹2,000 जमा होणार आहेत. सरकार दिवाळी 2025 च्या मुहूर्तावर, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, २१वा हप्ता जारी करण्याची तयारी करत आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल आहे!
तुम्ही हा हप्ता मिळवण्यास पात्र आहात की नाही? कारण, काही त्रुटींमुळे लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. तुमचा हप्ता सुरळीत यावा यासाठी कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, आणि कोणत्या शेतकऱ्यांना या पेमेंटपासून वंचित राहावे लागेल? जाणून घ्या...

अनेकांना या हप्त्याची प्रतीक्षा असली तरी, काही शेतकऱ्यांना मात्र या पेमेंटपासून वंचित राहावे लागू शकते. पात्रता आणि अचूक कागदपत्रे असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
कोणत्या शेतकऱ्यांना २१वी हप्ता मिळणार नाही?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. खालील त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात.
- ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केलेले शेतकरी.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेले शेतकरी.
- बँक खात्याचा IFSC कोड चुकीचा असलेले.
- बँक खाते बंद असलेले.
- वैयक्तिक तपशील जुळत नसलेले
या त्रुटींमुळे पेमेंट ट्रान्सफरची प्रक्रिया थांबते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी आणि बँक तपशील त्वरित तपासून ते अद्ययावत करून घ्यावेत.
पूरग्रस्त राज्यांना मिळाली आगाऊ मदत
या दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या पूरग्रस्त राज्यांमधील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळेपूर्वीच ₹2,000 चा हप्ता देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनी या आठवड्यात आपले स्टेटस तपासावे.
तीन राज्यांना का दिला अॅडव्हान्स हप्ता
या तिन्ही राज्यांनी नुकताच अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या कठीण परिस्थितीत, केंद्र सरकारने वेळेवर आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दुर्गा पूजेचा मोठा दिलासा दिला आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, कसे तपासाल?
PM किसानचा हप्ता आला की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम मॅसेज (Message) तपासा: हप्ता जमा झाल्यावर सरकार आणि बँक, दोन्हीकडून शेतकऱ्याला मॅसेज पाठवला जातो. जरमॅसेज आला नसेल, तर जवळच्या ATM मध्ये जाऊन बॅलन्स तपासा किंवा बँक शाखेत पासबुकमध्ये एंट्री करून घ्या.












Click it and Unblock the Notifications