Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Petrol Diesel Rate : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? निवडणुकीपुर्वी दिलासा मिळू शकतो!

Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी होत असतानाच आता भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर होण्याची शक्यता आहे. ही खुशखबर असून निवडणुकीच्या आधी इंधनाच्या दरात कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलीची किंमत कमी होत असल्याने जगात इंधनाच्या किमती घसरल्या आहेत, पण भारतात इंधनाच्या किमती कमी होत नाही, त्यामुळे भारतात इंधनाच्या किमती कधी कमी होणार हे स्पष्ट नाही पण आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली असं यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

Petrol Diesel Rate News Fuel will be cheaper

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर काय?

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात प्रति पिंप 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एक दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सध्या दरात चढ उतार सुरुच आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यास वाव आहे.

मोदी सरकारने इंधनावरील शुल्क कमी केल्यानंतर देशात इंधनाच्या किमतीत बदल पाहायला मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे सरकारने तेलाच्या किमतीत कपात केली. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला. या किमती अजूनही स्थिर असून दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत.

देशात केवळ लोकसभा निवडणुकीच्या काळातच देशात पेट्रोल डिझेलच्या दरात अंशतः कपात झाली. ती वगळता गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात बदल झाले नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का नाही ही सांशकता असली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर पाहात देशात इंधन दर कमी होणार नाहीत, असे म्हणता येणार नसल्याचेही त्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिली आहे.

दोन रुपयांची होऊ शकते कपात

राज्य सरकारने यापुर्वी महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करुन दिलासा दिलेला आहेच पण आता पुन्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या धर्तीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा सामान्यांना आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान दोन रुपये कपात होण्याचा अंदाज आहे.

भारताची इंधन आयात किती?

संयुक्त अरब अमिराती संघातील देशांत तेलाची निर्यात होते. खासकरुन इराणकडून भारत तेल आयात करतो. भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारताला इराणसह अन्य आखाती देशांवर अवलंबुन राहावे लागते. भारत जवळपास 87 टक्के विदेशी इंधन स्त्रोतावर अवलंबून आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+