Petrol Diesel Price Today : इंधनाचे दर घटले! टाकी फुल करण्यापूर्वी तुमच्या शहरातील ताजे रेट तपासा
Petrol Diesel Price Today : वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! प्रत्येक दिवसाप्रमाणेच, आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मागील काही दिवसांपासून दरात मोठे बदल दिसले नसले तरी, गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी आज, ३ ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचा नेमका भाव काय आहे, हे जाणून घेणे अनिवार्य आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत आणि विदेशी विनिमय दर यावर इंधनाचे दर अवलंबून असतात, जे दररोज सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. जाणून घ्या, आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये इंधनाचे दर किती आहेत.
प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (३ ऑक्टोबर २०२५)
- नवी दिल्ली - ₹ ९४.७७ ₹ ८७.६७
- मुंबई - ₹ १०३.५० ₹ ९०.०३
- कोलकाता - ₹ १०५.४१ ₹ ९२.०२
- चेन्नई - ₹ १००.९० ₹ ९२.४८
- बेंगलुरु - ₹ १०२.९२ ₹ ९०.९९
- नोएडा - ₹ ९४.७७ ₹ ८७.८९
- अहमदाबाद - ₹ ९४.४९ ₹ ९०.१६
- जयपूर - ₹ १०४.७२ ₹ ९०.२१
- इंदूर - ₹ १०६.४१ ₹ ९१.८१
१ लीटर पेट्रोलवर किती कर लागतो?
भारतात इंधनाच्या किमती वाढलेल्या दिसतात, याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी लावलेले मोठे कर आहेत. १ लीटर पेट्रोलवर किती कर लागतो हे उदाहरणासह समजून घ्या.
उदाहरणार्थ: ₹ ९४.७७ प्रति लीटरच्या अंतिम किमतीत
मूलभूत किंमत (बेस प्राइस + फ्रेट): ₹ ५३.०७
केंद्र सरकारचा उत्पादन शुल्क : ₹ २१.९०
राज्य सरकारचा व्हॅट : ₹ १५.४०
डीलर कमिशन : ₹ ४.४०
पेट्रोल आणि डिझेल सध्या वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत नाहीत. त्यामुळे, जीएसटी दरांमध्ये कोणत्याही प्रकारची कपात झाली तरी त्याचा परिणाम इंधनाच्या किमतींवर होणार नाही.
जीएसटी कपातीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले का?
जीएसटी कपातीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले का असा अनेकांना प्रश्न आहे याचे उत्तर म्हणजे.. सध्या पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेतून बाहेर आहेत. याचा अर्थ जीएसटी दरांमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केल्यास त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होणार नाही.
वास्तविक पाहता, भारतात पेट्रोल-डिझेलची किरकोळ किंमत त्यांच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त असते. यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांकडून लावले जाणारे अतिप्रचंड कर












Click it and Unblock the Notifications