Paytm चा धमाका! 'आज खर्च करा, 30 दिवसांनी पैसे भरा', व्याज शुन्य! - UPI पोस्टपेड क्रेडिट लाईन लाँच
Paytm launches UPI postpaid credit line : पेटीएमने डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती केली आहे, आता पेटीएममध्ये पेटीएम पोस्टपेड असा पर्याय असेल आणि हे क्रेडीटकार्डसारखे वापरता येणार आहे. आता खर्च करा, हवी ती खरेदी करा, पैसे वापरा आणि देण्याची वेळ आली तर लगेच नव्हे तर ३० दिवसांनी द्या असा हा पोस्टपेड प्लॅन आहे, या काळात व्याजही लागणार नाही हे विशेष.

नोकरदारापासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच ही गोष्ट फायदेशीर असून महिन्याच्या शेवटी-शेवटी पगाराची वाट पाहणाऱ्यांना तर हे फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी ही एक मोठी आणि फायदेशीर सुविधा सुरू केली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सोबत मिळून 'पेटीएम पोस्टपेड UPI क्रेडिट लाईन' लाँच केली आहे.
३० दिवस व्याज लागणार नाही
पेटीएमच्या या नव्या फीचरमुळे, आता तुम्ही 'आज खर्च करा आणि पुढील महिन्यात पैसे भरा' या सुविधेचा लाभ घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या क्रेडिट लाईनवर ३० दिवसांपर्यंत कोणतेही व्याज लागणार नाही!
काय आहे ही खास सुविधा आणि तिचे फायदे?
हे नवीन फीचर अशा लोकांसाठी डिझाइन केले आहे, जे रोजच्या लहान-मोठ्या खर्चांसाठी UPI चा वापर करतात. हे फीचर महिन्याच्या मध्यात अचानक येणाऱ्या खर्चांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
आधी पैसे वापरा आणि नंतर भरा : तुम्ही कुठेही UPI QR कोड स्कॅन करून किंवा डिजिटल पेमेंट करून खरेदी करू शकता आणि त्याचे बिल पुढील महिन्यात भरू शकता.
३० दिवसांपर्यंत शून्य व्याज: या क्रेडिट लाईनवर ३० दिवसांपर्यंत कोणतेही व्याज लागणार नाही, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.
असा करता येईल वापर
- दुकानांमध्ये QR कोड स्कॅन करून पेमेंट.
- ऑनलाइन शॉपिंग आणि फूड ऑर्डर.
- मोबाईल, DTH, वीज आणि पाण्याच्या बिलांचे पेमेंट.
- पेटीएम ॲपवर तिकीट बुकिंग आणि रिचार्ज.
हे फीचर कसे वापरावे?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:
- तुमच्या पेटीएम ॲपमध्ये 'पेटीएम पोस्टपेड' पर्याय निवडा.
- तुमची KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करा.
- आपले खाते सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेद्वारे UPI ला लिंक करा.
सुरुवातीला ही सेवा काही ठराविक ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे, पण लवकरच ती जास्तीत जास्त लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल.
पेटीएमचे हे नवीन पाऊल डिजिटल पेमेंटला अधिक सोयीस्कर बनवेल आणि खासकरून अशा लोकांसाठी फायदेशीर ठरेल, जे कॅशची चिंता न करता रोजचे व्यवहार ऑनलाइन करू इच्छितात.












Click it and Unblock the Notifications