PAN Card: आता तुम्ही घरबसल्या पॅन कार्डवरील जन्मतारीख दुरुस्त करू शकता, जाणून घ्या प्रक्रिया
PAN Card Date Of Birth Change Process: आधारकार्डप्रमाणचे पॅनकार्ड ही आवश्यक असं डॉक्यूमेंट आहे. तुम्हाला आर्थिक व्यवहार, बॅंकेशी संबंधित कोणतेही काम करायचं असेल तर त्याठिकाणी पॅनकार्ड आवश्यक लागतं.
जर तुम्ही देखील पॅन कार्ड वापरत असाल आणि तुमच्या पॅन कार्डवर जन्मतारीख चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेली असेल तर ते अपडेट करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सेतू केंद्र किंवा इतर ठिकाणी जाण्याची अजिबात गरज नाही. हे काम तुम्ही अगदी घरबसल्या करु शकता. तर चला मग तुमच्या पॅन कार्डवरील जन्मतारीख कशी दुरुस्त करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला तुमच्या पॅन कार्डच्या जन्मतारखेत काही चूक आढळल्यास, तुम्ही ती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाइन सहज दुरुस्त करू शकता.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बदल आणि दुरुस्ती पर्यायवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पॅन कार्ड रीप्रिंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करून पुढे जावे लागेल.
यानंतर तुम्ही तुमची कोणतीही माहिती पॅन कार्डमध्ये अपडेट करू शकता. जसे मेल आयडी, फोन नंबर आणि जन्मतारीख. जन्मतारीख बदलण्यासाठी, तुम्हाला काही सहाय्यक कागदपत्रे विचारली जातील. जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट. यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करावे लागेल. त्यानंतर पेमेंट पूर्ण करावे लागेल. जे तुम्ही UPI किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे देऊ शकता.
किती आहे फिस
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी भारत सरकार 101 रुपये शुल्क आकारते. ऑनलाइन फी भरल्यानंतर तुम्ही तुमचा ट्रांजक्शन क्रमांक लक्षात ठेवावा. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. हा फॉर्म काळजीपूर्वक वाचून आवश्यक माहिती भरा. यानंतर फॉर्म प्रिंट करा. आणि NSDL e-Gov कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवा.
हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो आपल्याला सरकारी आणि निमसरकारी कामासाठी आवश्यक आहे. पॅन कार्डमध्ये जन्मतारीख चुकीची असल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आता तुम्ही घरबसल्या पॅन कार्डवरून तुमची जन्मतारीख दुरुस्त करू शकता.
तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये जन्मतारीख वेळेत दुरुस्त करून घ्यावी कारण कोणत्या दस्तऐवजात ती कोणत्या वेळी दुरुस्त करावी लागेल हे तुम्हाला माहीत नसते. आयकराशी संबंधित सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो आणि तो महत्वाचे डॉक्यूमेंट म्हणूनही गणला जातो.












Click it and Unblock the Notifications