गुड न्यूज! सोने-चांदी, मोबाईल होणार स्वस्त, अर्थसंकल्पातील तुमच्या फायद्याच्या 'या' 5 गोष्टी
सोने-चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज असून आता हे दागिने स्वस्त होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी सोने -चांदीचे दागिने स्वस्त होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा केली.
मोबाईल फोन स्वस्त होणार
अर्थमंत्र्यांनी मोबाइल फोन, मोबाइल चार्जरवरील बीसीडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता मोबाईल फोन नागरिकांना स्वस्त मिळणार आहे. यासह आणखी काही महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्या आल्या आहेत. पाहूया काय आहेत फायद्याच्या पाच गोष्टी.

- अर्थमंत्र्यांनी फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक घटक असलेल्या लिथियम-आयन बॅटरीवरील कर दरातही कपात केली होती. या धोरणातील बदलामुळे कंपन्यांना भारतात फोनचे उत्पादन स्वस्त करणे हा आहे.
- सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने खरेदीदारांना वाढत्या दरवाढीतून थोडासा दिलासा मिळणार आहे.
- तीन कॅन्सर उपचार औषधांना मूळ सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर्करोगाने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
- एफएमने सौर पॅनेलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूट भांडवली वस्तूंची यादी वाढवण्याचाही प्रस्ताव दिला.
- 2023 च्या वार्षिक अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्र्यांनी भारतात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्ससह विविध घटकांवरील आयात कर कमी करण्याची घोषणा केली होती.
या गोष्टी तुमच्या फायद्याच्या...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताचा मोबाइल उद्योग खूप मोठा झाला आहे, त्यामुळे त्याच्या मूलभूत कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. मोबाईल फोनवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
यासोबतच पीसीडीए आणि मोबाईल चार्जेसमध्ये 15 टक्के कपात करण्यात आली आहे. यासोबतच अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केली आहे. तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी 6.4 टक्के करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सर्किट बोर्ड असेंब्ली आणि टेलिकॉम उपकरणांवरील शुल्क 10-15 टक्क्यांनी कमी केले आहे.
बजेटमध्ये काय स्वस्त झालं
- मासे अन्न
- कर्करोग औषध
- सोने चांदी
- प्लॅटिनम
- भ्रमणध्वनी
- मोबाइल चार्जर
- विद्युत तारा
- एक्स-रे मशीन, सोलर सेट, लेदर आणि शूजवर कस्टम ड्युटी कमी केली आहे.
- तीन कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली.
दूरसंचार उपकरणे महागणार
यासोबतच या वस्तूंवरील सीमा शुल्क 15 टक्के करण्यात आल्याने त्यांच्या किमतीही वाढणार आहेत. या बदलामुळे देशातील दूरसंचार सेवा आणि उपकरणांच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. अर्था त्या महागणार आहेत.
महागाई दर 4 टक्के
अर्थमंत्र्यांनी भर दिला की, जागतिक चलनवाढीचा दबाव असूनही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली असून, चलनवाढ 4 टक्के च्या आत राहिली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून या संपूर्ण अर्थसंकल्पात या गटांना प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्थमंत्र्यांनी प्रामुख्याने कर्करोगाच्या औषधांवरील सीमाशुल्क शून्य केले आहे. याशिवाय मोबाइल उपकरणे आणि चार्जरवरील सीमा शुल्क (बीसीडी) 15% कमी करण्यात आले आहे. या पावलेमुळे या जीवनावश्यक वस्तू ग्राहकांसाठी खूपच स्वस्त होतील.












Click it and Unblock the Notifications