Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवीन वर्षाची मोठी भेट! 1 जानेवारीपासून CNG आणि PNG स्वस्त होणार? गॅसच्या किमतीत कपातीचे संकेत

New Year Gift CNG and PNG Prices Likely to Drop : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामान्य जनतेला महागाईतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरने (PNGRB) गॅस वाहतुकीच्या शुल्कात (Transport Charges) कपात आणि सुलभीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे १ जानेवारी २०२६ पासून तुमच्या घरगुती गॅस (PNG) आणि वाहनांच्या इंधनाचा (CNG) खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो असे 'गुडरिटर्न्स'च्या वृत्तात म्हटले आहे.

New Year Gift CNG and PNG Prices Likely to Drop

"२०२६ सालाची सुरुवात खिशाला परवडणारी ठरणार आहे! नॅचरल गॅस रेग्युलेटरने गॅस पाइपलाइन शुल्काचा गुंतागुंतीचा 'टॅरिफ स्लॅब' बदलण्याचा निर्णय घेतल्याने देशातील करोडो ग्राहकांना फायदा होईल अशी शक्यता आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या शहरांमध्ये जिथे गॅस महाग मिळत होता, तिथे आता किमतीत मोठी घट पाहायला मिळू शकेल. नव्या वर्षात सीएनजी गाड्यांचे मालक आणि गृहिणींना बजेटमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळू शकते."

गॅस टॅरिफ सिस्टममध्ये काय बदल झाला?

  • आतापर्यंत गॅस पाइपलाइनचे शुल्क अंतरावर अवलंबून तीन वेगवेगळ्या स्लॅबमध्ये आकारले जात असे. त्यामुळे ज्या शहरांपर्यंत गॅस पोहोचण्यासाठी जास्त अंतर कापले जाई, तिथे गॅस महाग पडत असे.
  • नवा नियम: आता हे तीन स्लॅब बंद करून फक्त दोन झोन तयार करण्यात आले आहेत.
  • फायदा: पहिल्या झोनमध्ये संपूर्ण देशातील घरगुती पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांचा समावेश असेल. यामुळे एकसमान आणि कमी शुल्क आकारले जाईल, परिणामी गॅसच्या अंतिम किमतीत कपात होईल.

टॅरीफ कपातीचा फायदा ग्राहकांनाही द्यावा

रेग्युलेटरने स्पष्ट केले आहे की, टॅरिफमधील कपातीचा फायदा कंपन्यांनी स्वतःच्या नफ्यासाठी न ठेवता थेट ग्राहकांना दिला पाहिजे. सिटी गॅस कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत की नाही, यावर PNGRB बारीक लक्ष ठेवणार आहे.

प्रदूषणमुक्त इंधनावर भर

सरकारचा उद्देश जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त इंधन पोहोचवणे हा आहे. अनेक राज्य सरकारेही नॅचरल गॅसवरील टॅक्स कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामुळे टॅक्सी, ऑटो आणि खासगी वाहन चालकांसह गृहिणींचे मासिक बजेट सुसह्य होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+