Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

1 कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारात उद्या हजारोंची वाढ; नेमके काय आहे कारण? किती वाढणार पगार? वाचा

सरकारच्या नव्या टॅक्स धोरणानुसार एक लाख मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. यापूर्वी म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षांत सात लाक रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर घेतला जात नव्हता. मात्र आता २०२५-२६ या आर्थिक वर्षांत ही मर्यादा १२ लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये महिना पगार आहे, त्यांना एप्रिलचा पगार हा पुर्णपणे मिळणार आहे. त्यात कोणतीही कपात होणार नाही. या निर्णयामुळे उद्या १ मे रोजी देशभरातली एक कोटी नोकदरांचा पगार वाढणार आहे.

new tax policy

किती वाढणार पगार

नव्या टॅक्स धोरणानुसार सरकारने २०२५-२६ या नव्या आर्थिक वर्षांपासून १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून ज्यांना एक लाख रुपये पगार आहे, त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. गेल्या महिन्यात आलेल्या पगारात गेल्यावर्षीच्या नियमाप्रमाणे वर्षाला ७१५०० रुपये टॅक्स भरावा लागत होता. म्हणजेच ज्यांना एक लाख रुपये पगार आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५९५८ रुपये कपात केली जात होती. मात्र आता एप्रिल महिन्याचा १ मे रोजी येणारा पगारात ही ५९५८ रुपयांची कपात केली जाणार नाही.

कसा आहे नवा नियम?

केंद्र सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात कलम ८७ अ अंतर्गत कर सवलतीची रक्कम ६० हजार रुपये केली आहे. नवीन कर प्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर स्लॅबनुसार ५२,५०० रुपये कर आकारला जाणार जातो. परंतु जर ८७ अ अंतर्गत ५२,५०० रुपयांची कर सवलत उपलब्ध असेल तर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या महिन्याच्या पगारात ५९५८ रुपये जास्त मिळणार आहेत.

१२ लाखांपर्यंत टॅक्स फ्री

१ एप्रिल २०२५ पासून नवीन कर व्यवस्था लागू झाली. १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. याशिवाय नवीन कर प्रणालीमध्ये ७५ हजार रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ देखील उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख ७५ हजार आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा फायदा भारतातील सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय नोकरदारांना होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+