Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

New rules : 'एटीएम ते एलपीजी', हे 6 नियम 1 जूनपासून बदलतील तुमच्या खिशावर होऊ शकतो थेट परिणाम

New rules from June 1 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही न् काही बदल घडतात. केंद्र सरकार असो की, तेल कंपन्या अथवा बँका आपापल्या कार्यक्षेत्रात काही न् काही बदलत करतात, जसा दर महिन्याची पहिली तारीख पगाराची असते तशीच दर महिन्याची पहिली तारीख लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवते.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला नेमके काय बदल होतात हे अनेकांना माहित असले तरीही ठोस माहिती नसते तर काहींना याची कल्पनाही नसते पण हे बदल तुमच्या आमच्या खिशावर भार टाकतात. त्यामुळे आपल्याला हे बदल जाणून घेणे आवश्यक असते. माहितीच्या अभावी संभाव्य परिणामाचा फटका बसू नये म्हणून 1 जूनपासून होणाऱ्या 5 मोठ्या नियमांबद्दल तुम्ही या लेखातून जाणून घेणे श्रेयस्कर ठरते.

New rules from June 1

1 जून पासून काय बदलणार?

1. एलपीजी गॅसच्या किमती

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला, तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. इंडियन ऑइलने 1 मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 17 रुपयांची कपात केली होती, जरी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. 1 जूनपासून घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 10 ते 50 रुपयांपर्यंत बदलण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजीचे नवीन दर अधिकृत वेबसाइट किंवा गॅस डीलरवरून कळू शकतात.

2. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, ही प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल. जर तुम्ही हे काम 14 दिवसांच्या आत पूर्ण करू शकला नाही, तर नंतर तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

3.एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा

  • आता महिन्यात 3 मोफत व्यवहारांनंतर, प्रत्येक वेळी 25 रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागू शकते.
  • काही बँकांनी दररोज पैसे काढण्याची मर्यादा देखील कमी केली आहे.
  • घराबाहेरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.

4. EPFO ​​ची नवी आवृत्ती लाँच होईल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयोगाची नवीन आवृत्ती म्हणजेच EPFO 3​.0 अॅप जूनमध्ये लाँच केले जाऊ शकते. जर असे झाले तर 9 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होईल, त्यांना भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट एटीएममधून मिळतील. क

5. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम लागू

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम 1 जूनपासून लागू होतील, जो कोणी त्यांचे पालन करणार नाही त्याला मोठा दंड भरावा लागेल. नवीन नियमांमध्ये वाहनाच्या वेगापासून ते हेल्मेटपर्यंतचे नियम समाविष्ट आहेत.

6. बँक सुट्टीच्या यादीत बदल

जून महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक बँक सुट्ट्या असतील. 1 जून रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तसेच, जून 2025 मध्ये एकूण 13 बँकांना सुट्ट्या असतील. ग्राहकांना त्यांचे बँकेशी संबंधित काम वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+