Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

New Rules in Oct 2024:आजपासून लागू होणार हे 5 मोठे बदल,तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम,घ्या जाणून

New Rules in October 2024: आज पासून ऑक्टोबरला महिन्याला सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे या महिन्यात काही महत्वाचे बद्दल करण्यात आले आहेत. आज 1 ऑक्टोबर 2024 पासून अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. PPF, सुकन्या समृद्धी योजना, डेबिट कार्ड, F&O ट्रेडिंगवरील STT इत्यादी अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. कोणते नियम बदलले आहेत आणि त्यांचा काय परिणाम होईल ते आपण जाणून घेऊया.

1. क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये आजपासून काही बदल आजपासून लागू होणार आहेत. HDFC बँकेने त्यांच्या काही क्रेडिट कार्डांसाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये काही बदल केले आहेत. तुम्ही जर HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याची झळ तुमच्या खिशावर होणार आहे. HDFC बँकेने SmartBuy प्लॅटफॉर्मवरील Apple प्रॉडक्टसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे. एवढेच नाही तर पंजाब नॅशनल बँकेने क्रेडिट कार्ड सेवेशी संबंधित अनेक शुल्कांमध्ये बदल केले आहेत, जसे की किमान सरासरी शिल्लक रक्कम ठेवणे आणि चेक रिटर्न चार्जेस. हे नवे शुल्क बँकेकडून आजपासून लागू केले जाणार आहे.

New Rules in Oct 2024

2. पोस्ट ऑफिस योजनेत बदल होतील

1 ऑक्टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत केवळ कायदेशीर पालकच मुलींचे खाते चालवू शकतील. म्हणजेच, जर तुमच्या मुलीचे खाते आजी-आजोबा किंवा तिच्या कायदेशीर पालक नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने उघडले असेल, तर त्यांना 1 ऑक्टोबरपासून हे खाते मुलीच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांकडे ट्रान्सफर करावे लागणार आहे. तसे न केल्यास खाते बंद केले जाईल. याशिवाय पीपीएफ खात्याशी संबंधित बदलही आजपासून लागू केले जाणार आहेत. अल्पवयीन आणि एनआरआय खात्यांशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. याशिवाय जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असतील तर ते विलीन करावे लागणार आहेत.

3. F&O ट्रेडिंगवर STT वाढेल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली होती की, 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ होणार आहे. (F&O) फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्यात आला आहे. पर्यायांच्या विक्रीवरील STT प्रीमियमच्या 0.0625% वरून 0.1% करण्यात आला आहे.

4. पॉलिसीधारकाला कमी TDS भरावा लागेल

1 ऑक्टोबर 2024 पासून पॉलिसीधारकांना कर बदलांचा मोठा फायदा होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून, जीवन विमा पॉलिसीधारकांना कमी TDS (Tax deducted at Source) चा लाभ मिळेल. यापूर्वी आयुर्विमा टीडीएस दर 5 टक्के होता, तो आता 2 टक्के करण्यात येणार आहे. पॉलिसीधारकाला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सरकार टीडीएसमध्ये ही कपात करत आहे. याशिवाय प्रत्येकाला त्यांच्या मॅच्युरिटीचा किंवा क्लेमचा फंडचा मोठा हिस्सा मिळायला हवा.

5. आधार कार्डशी संबंधित बदल

5. 1 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही यापुढे पॅन एलोकेशन अर्जामध्ये आणि तुमच्या आयकर रिटर्नमध्ये तुमचा आधार नोंदणी आयडी नमूद करू शकणार नाही. त्याऐवजी आधार क्रमांक वापरणे बंधनकारक असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+