Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

New rules from 1 march 2026 आजपासून बदलले 6 मोठे नियम; WhatsApp बंद होणार की सुरू? वाचा संपूर्ण यादी

New rules from 1 march 2026 : आजपासून मार्च महिन्याला सुरुवात झाली असून, सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि खिशावर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांपासून ते Whats App वापरण्याच्या पद्धतीपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. खास करुन WhatsApp सुरु ठेवायचे असेल आणि ते चालवण्यासाठी सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे अनिवार्य आहे. म्हणजेच 'सिम-बाइंडिंग' आलश्यक आहे ते काय आहे हेही जाणून घेऊया.

New rules from 1 march 2026

आजपासून झालेले प्रमुख बदल एका नजरेत
  • १. LPG सिलेंडर महागला: कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (१९ किलो) दरात २८ ते ३१ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता हा सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळेल. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र बदल झालेला नाही.
  • २. WhatsApp साठी नवीन नियम (Sim-Binding): टेलिकॉम विभागाच्या नवीन नियमानुसार, ज्या नंबरवर तुमचे Whats App आहे, ते सिम कार्ड त्याच मोबाईलमध्ये असणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमचे Whats App अकाऊंट बंद होऊ शकते.
  • ३. रेल्वेचे 'RailOne' ॲप: आजपासून जुने UTS ॲप बंद होऊन 'RailOne' ॲप कार्यान्वित झाले आहे. जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट आता याच नवीन ॲपवरून बुक करावे लागेल.
  • ४.बँकिंग नियम: अनेक बँकांनी आजपासून किमान शिल्लक (Minimum Balance) आणि क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्सच्या नियमांत बदल केले आहेत.
  • ५. FASTag KYC सक्ती: जर तुमच्या फास्टॅगचे KYC अपडेट नसेल, तर आजपासून टोल प्लाझावर दुप्पट टॅक्स भरावा लागू शकतो.
  • ६. GST अपडेट: व्यापारी आणि उद्योजकांसाठी ई-इनव्हॉइसिंग आणि जीएसटी रिटर्नशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत.

Whats App चा नवीन 'सिम-बाइंडिंग' (SIM-Binding) नियम काय आहे?

आतापर्यंत आपण एका फोनमध्ये सिम कार्ड असूनही, दुसऱ्या फोनवर किंवा टॅबलेटवर त्या नंबरचे व्हॉट्सअॅप वापरू शकत होतो. पण १ मार्च २०२६ पासून दूरसंचार विभागाने (DoT) सुरक्षेच्या कारणास्तव नियम बदलले आहेत.

१. सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे अनिवार्य

ज्या मोबाईल नंबरवर तुमचे Whats App अकाउंट आहे, ते सिम कार्ड (SIM Card) त्याच मोबाईलमध्ये सक्रिय (Active) असणे आता गरजेचे आहे. जर तुम्ही सिम कार्ड काढून कपाटात ठेवले असेल किंवा दुसऱ्या साध्या फोनमध्ये टाकले असेल आणि Whats App मात्र दुसऱ्या स्मार्टफोनवर चालवत असाल, तर तुमचे Whats App अकाउंट बंद होऊ शकते.

२. 'सिम-बाइंडिंग' म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमचे Whats App 'ॲप' आणि तुमचे 'सिम कार्ड' यांची आता गाठ बांधली (Binding) जाणार आहे. तुमचे व्हॉट्सअॅप वेळोवेळी पडताळणी करेल की, ज्या नंबरवर हे Whats App सुरू आहे, ते सिम कार्ड खरोखर त्या फोनमध्ये आहे की नाही.

३. हे पाऊल का उचलले आहे?

हल्ली सायबर फ्रॉड आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा लोकांचे Whats App हॅक करून किंवा दुसऱ्याच्या नंबरवर Whats App चालवून फसवणूक केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी 'सिम-बाइंडिंग' चा नियम आणला आहे.

४. कोणावर परिणाम होईल?

जे लोक एका फोनमध्ये सिम वापरतात आणि दुसऱ्या फोनमध्ये फक्त 'वायफाय' (Wi-Fi) वर Whats App चालवतात.

ज्यांचे सिम कार्ड बंद झाले आहे किंवा हरवले आहे, तरीही जुन्या नंबरवर Whats App सुरू आहे.

५. काय काळजी घ्यावी?

तुमचे Whats App ज्या नंबरवर आहे, ते सिम कार्ड तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनमध्येच ठेवा.

जर तुम्ही नवीन फोन घेतला असेल, तर जुन्या फोनमधील सिम नवीन फोनमध्ये टाकूनच Whats App सुरू करा.

थोडक्यात सांगायचे तर: "ज्याचा नंबर, त्याच फोनमध्ये सिम!" तरच तुमचे Whats App विनाअडथळा सुरू राहील.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+