Reliance tax paid in 2024:रिलायन्सने सरकारी तिजोरीत भरला एवढा टॅक्स,आकडे ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

Income Tax paid by Reliance industries : देशाच्या अर्थव्यवस्थेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे योगदान आहे. रिलायन्स कंपनीने गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1,86,440 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 9 हजार कोटी रुपयाने अधिक आहे. या आर्थिक वर्षात कंपनीच्या भांडवलातही 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील आघाडीची खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी 2023-24 हे आर्थिक वर्ष अतिशय फायदेशीर ठरले आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

mukesh ambani

2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवलचा टप्पा ओलांडला आहे. हा आकडा पार करणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. जगभरात भांडवलीकरणाच्या बाबतीत 48 व्या क्रमांकावर आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स कंपनी निर्यातीतही आघाडीवर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात देशाच्या निर्यातीत मोठे योगदान दिले आहे. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजने 3 लाख कोटी रुपयांची निर्यात केल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजने 1 लाख 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. टॅक्सनंतरही कंपनीचा नफा 79 हजार कोटींहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 7.3 टक्के अधिक आहे.

कंपनीने किती गुंतवणूक आणि खर्च केला?

रिलायन्स इंडस्ट्रीजने सामाजिक कामासाठी ही मोठं योगदान दिलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सामाजिक सेवांसाठी 1592 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्यावेळेच्या तुलनेत ही रक्कम 300 कोटी रुपये अधिक आहे. कंपनीचा नफाही गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक राहिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+