Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mother's Day 2025 : मदर्स डे निमित्त बीएसएनएलची मोठी ऑफर! 'हे' 3 रिचार्ज प्लॅन झाले स्वस्त!

Mothers day 2025 BSNL big offer : खासगी टेलिकाॅम कंपन्यांना जोरदार टक्कर देणारी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिडेटने मातृदिनी खास ऑफर आणली आहे. मातृदिनानिमित्त एक खास पोस्ट करुन कंपनीने एक्सवरील अकाऊंटवरही आपल्या ग्राहकांसाटी ही माहिती दिली आहे.

बीएसएनएलने जाहीर केलेली ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि यामध्ये कंपनीने तीन प्रमुख रिचार्ज प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. बीएसएनएल त्यांच्या परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह योजनांसाठी ओळखले जाते. आता कंपनीने पुन्हा एकदा कमी किमतीत लोकांना अधिक फायदे देण्यासाठी ही ऑफर सुरू केली आहे.

Mothers day 2025

कधीपासून मिळणार बीएसएनलची ऑफर

बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन आणते. ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार नाही, याची पुरेपूर काळजी बीएसएनएल घेते, यादरम्यान मातृदिनानिमित्त बीएसएनने आणलेली सवलत योजना 7 मे 2025 पासून सुरु झाली आहे. मदर्स डे येत्या 11 मे रोजी आहे, म्हणजेच त्याआधी पाच दिवसांनी आणि नंतर तीन दिवसांनी 14 मे 2025 पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे. त्यानंतर ही ऑफर नसेल.

काय आहे उद्देश?

मातृदिनी ऑफर देऊन कंपनीला गुडवील तयार करायचे आहे याशिवाय ही ऑफर आणण्याचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या आईंना चांगल्या टेलिकॉम सेवा भेट म्हणून देता याव्यात हा आहे. ग्राहक एका आठवड्यासाठी कमी किमतीत या तीन खास योजना रिचार्ज करू शकतात.

कोणते रिचार्ज प्लॅन स्वस्त

बीएसएनएलने ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या तीन रिचार्ज प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. या प्लॅनमध्ये दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सुविधा उपलब्ध आहेत. आता हे 5 टक्के कमी किमतीत उपलब्ध करून दिले जात आहेत.

1. 2399 रुपयांचा दीर्घ वैधता प्लॅन - या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची दीर्घ वैधता. पूर्वी हा प्लॅन 2399 रुपयांना उपलब्ध होता, पण आता तो 2279 रुपयांना उपलब्ध आहे.395 दिवस वैधता मिळेल. दररोज 2 जीबी डेटा अमर्यादित व्हॉइस कॉलिंग दररोज 100 एसएमएस ज्यांना संपूर्ण वर्षभर फक्त एकदाच रिचार्ज करायचे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे.

2. 997 रुपयांचा मिडियम प्लॅन : 997 रुपयांचा प्लॅन आता 50 रुपयांनी कमी करून 947 रुपयांवर आला आहे. मध्यम कालावधीसाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय मानला जातो. या प्लॅनमध्ये वैधता 160 दिवस, दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा अमर्यादित कॉलिंग दररोज 100 एसएमएस हा प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना दीर्घ वैधतेसह चांगला डेटा बॅलन्स हवा आहे.

3. 599 रुपयांचा शाॅर्टटर्म प्लॅन : जर तुम्हाला कमी कालावधीसाठी अधिक डेटा आणि सर्व वैशिष्ट्ये हवी असतील तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याची नवीन किंमत आता 569 रुपये करण्यात आली आहे. 84 दिवसांची वैधता, दररोज 3 जीबी डेटा अमर्यादित कॉलिंग सुविधा दररोज 100 एसएमएस ही योजना खूप इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय असू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+