LPG price : मोठी बातमी! एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त; जुलैच्या पहिल्या दिवशी खूशखबर, नवे दर जाणून घ्या
LPG price : जुलै महिन्यात आज सकाळीच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किमती जाहीर करत असतात. यामध्ये कधी गॅस सिलिंडरचे भाव कमी तर कधी जास्त होतात. यावेळी मात्र गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, आज १ जुलै २०५ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

किती झाल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती?
आज सकाळी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे.आज मंगळवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ६० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीत त्याची किंमत १६६५ रुपये झाली आहे.
आता व्यावयासिक सिलिंडरचे मुंबईत दर किती?
- दिल्ली - १६६५ रुपये
- मुंबई - १६१६ रुपये
- कोलकाता - १७६९ रुपये
- चेन्नई - १८२३.५०
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या की वाढल्या?
१४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. जून महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती २४ रुपयांनी कमी झाल्या होत्या हे लक्षात घेण्यासारखे आहे. नवीन बदलानंतर, चार महानगरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती खालीलप्रमाणे आहेत.
१ जुलै २०२५ रोजी, १४.२ किलोच्या घरगुती LPG चे दर खालीलप्रमाणे..शहर दर (रुपयांमध्ये)
- मुंबई ८५२.५०
- पुणे ८५६
- दिल्ली ८५३.००
- गुरुग्राम ८६१.५
- अहमदाबाद ८६०
- जयपूर ८५६.५
- पटना ९४२.५
- आग्रा ८६५.५
- मेरठ ८६०
- गाझियाबाद ८५०.५
- इंदूर ८८१
- भोपाळ ८५८.५
- लुधियाना ८८०
- वाराणसी ९१६.५
- लखनऊ ८९०.५
- हैदराबाद ९०५
- बंगळुरू ८५५.५
घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरमध्ये फरक काय?
घरगुती सिलिंडर
- घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर (एलपीजी किंमत) घरगुती सिलेंडरचा आकार साधारणपणे १४.२ किलो असतो. तो घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस हीटरमध्ये आणि ग्रामीण भागात प्रकाशयोजनासाठी एलपीजी दिव्यांमध्ये वापरला जातो.
- घरगुती एलपीजी सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते.
- घरगुती सिलिंडरसाठी सुरक्षा मानके वेगळी आहेत आणि ती घरगुती उपकरणांसह सुरक्षितपणे वापरली जातात.
- घरगुती एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सी आणि डिलर्सकडून सहज उपलब्ध आहे आणि ग्राहक घरी बसून ते ऑर्डर करू शकतो.
- घरगुती सिलिंडर बुकिंग ऑनलाइन, गॅस एजन्सींद्वारे किंवा मोबाईल App द्वारे करता येते.
व्यावसायिक सिलिंडर
- व्यावसायिक गॅस सिलिंडर साधारणः १९ किलोंचा असतो.
- हा सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरता येतो.
- व्यावसायिक कामांसाठी म्हणजेच हाॅटेल, मेस, आणि विविध मिष्ठान्न आणि खाद्यपदार्थाच्या दुकानात हा सिलिंडर वापरला जातो.
- व्यावसायिक कामांसाठी घरगुती सिलिंडर वापरण्यास बंदी आहे.












Click it and Unblock the Notifications