Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले! जूनच्या पहिल्याच दिवशी खूशखबर..

LPG price : जूनच्या पहिल्याच दिवशी एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंडियन ऑइलने शनिवारी रात्रीच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 24 रुपयांनी कमी केली आहे.
त्यामुळे ग्राहकांना आजपासून लागू झालेल्या नवीन किमतीत गॅस सिलिंडर मिळणार आहे. या घोषणेनंतर, आता हे सिलेंडर मुंबईत 1674.50 रुपयांना मिळणार आहे.

राजधानी दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडर 1723.50 रुपयांना उपलब्ध होईल. देशातील चारही प्रमुख शहरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती किती राहतील हे जाणून घेऊया.

LPG price

LPG गॅस सिलिंडरचे भाव

  • दिल्ली- 1742 रुपये
  • मुंबई- 1674.50 रुपये
  • कोलकाता - 1826 रुपये
  • चेन्नई- 1881 रुपये घरगुती

    Take a Poll

    सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही

    प्राप्त माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तूर्त कोणताही बदल झालेला नाही, त्याचा दर सध्या स्थिर आहे. 8 एप्रिल रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती, परंतु मे नंतर जूनमध्येही त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

    घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर किती आहेत?

    घरगुती एलपीजी सिलिंडरचे दिल्लीतील दर 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये तर चेन्नईत 870.50 रुपये इतका दर आहे.

    घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमधील फरक

    • घरगुती एलपीजी सिलिंडर प्रामुख्याने घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरले जातात. त्याचे वजन साधारणपणे 14.2 किलो असते.
    • घरगुती एलपीजी सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते.
    • घरगुती सिलिंडरसाठी सुरक्षा मानके वेगळी आहेत आणि ती घरगुती उपकरणांसह सुरक्षितपणे वापरली जातात.
    • घरगुती एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सी आणि डीलर्सकडून सहज उपलब्ध आहे आणि ग्राहक घरी बसून ते ऑर्डर करू शकतो.
    • घरगुती सिलिंडर बुकिंग ऑनलाइन, गॅस एजन्सींद्वारे किंवा मोबाईल अॅपद्वारे करता येते.

    व्यावसायिक सिलिंडर

    • हे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, अन्न उद्योग इत्यादींमध्ये वापरले जातात. हे सिलिंडर सोल्डरिंग किंवा हीटिंगसारख्या औद्योगिक ठिकाणीही वापरले जातात.
    • हे सिलिंडर १९ किलो, ३५ किलो किंवा ४७.५ किलोमध्ये येतात.
    • या सिलिंडरसाठी कोणतेही अनुदान उपलब्ध नाही.
    • हे सहसा निळे किंवा राखाडी रंगाचे असतात. केवायसीसाठी व्यवसाय नोंदणी, जीएसटी क्रमांक इत्यादी आवश्यक असतात.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+