Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एलपीजी गॅस दराबाबत मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये घरगुती, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढणार की घटणार?

LPG Price Alert : भारतातील एलपीजी (LPG) गॅसचे दर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण ऑक्टोबर महिना तोंडावर आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीपासून, भारतातील तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात केली आहे. याउलट, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर मे २०२५ पासून देशातील प्रमुख महानगरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता या महिन्यात केंद्र सरकार, गॅस विपनन कंपन्या खूशखबर देऊ शकतात, अशी शक्यता आहे.

LPG Price Alert

एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडिरचे दर गेल्या सहा महिन्यांपासून कमी होत आहेत, मात्र घरगुती गॅस सिलिंडरचे दर अद्यापही कमी झालेले नाहीत. गेल्या सहा महिन्यात सामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता ऑक्टोबरमध्ये भारताचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीमुळे, एलपीजीच्या दरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Take a Poll

१९ किलो व्यावसायिकसिलेंडरचे दर २२३ ते २२९ रुपयांनी घटले

मार्च २०२५ पासून १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर २२३ ते २२९ रुपयांनी घटले आहेत ही सहा महिन्यातील कपात आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये काय आहेत व्यावसायिक सिलिंडरचे दर

रु. १,५८० रु. १,६३१.५० रु. ५१.५० रु. २२३
कोलकाता रु. १,६८४ रु. १,७३४.५० रु. ५०.५० रु. २२९
मुंबई रु. १,५३१.५० .
चेन्नई रु. १,७३८ रु. १,७८९ रु. ५१ रु. २२७

ऑगस्टचे दर

शहर सप्टेंबरचे दर सप्टेंबरचे दर सप्टेंबरची दरकपात ६ महिन्यातील एकूण घट
दिल्ली १५८० रुपये ५१.५० रुपये २२३ रुपये
कोलकाता १६८४ रुपये ५०.५० रुपये २२९ रुपये
मुंबई रु. १,५३१.५० ५० रुपये २२४ रुपये


१४.२ किलो घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे..

८ एप्रिल २०२५ रोजी दर रु. ५० ने वाढल्यानंतर, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर सध्या स्थिर आहेत.

शहरसध्याचे दर प्रति सिलिंडर प्रति सिलिंडर
दिल्ली८५३
कोलकाता८७९
मुंबई८५२.५०
चेन्नई८६८

इन्डेन एलपीजी सिलेंडर ८ वेगवेगळ्या पॅक साईझमध्ये वितरीत केले जातात. ५ किलो आणि १४.२ किलोचे सिलेंडर प्रामुख्याने घरगुती वापरासाठी असतात, तर १९ किलो, ४७.५ किलो आणि ४२५ किलोचे जंबो सिलेंडर व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी बाजारात आणले जातात.

एलपीजी दरांवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

भारतात एलपीजीचे दर ठरवताना अनेक प्रमुख घटकांचा विचार केला जातो.

१. एलपीजीचे आंतरराष्ट्रीय दर (International Prices of LPG).
२. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीतील चढ-उतार.
३. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य (Rupee vs Dollar).
४. कस्टम शुल्क.
५. बॉटलिंग आणि मार्केटिंगचा खर्च.
६. डीलरचे कमिशन आणि पोर्ट शुल्क.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+