Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LPG Gas Cylinder Price : जीएसटी बदलानंतर एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या

LPG Gas Cylinder Price : जीएसटी परिषदेची बैठक ३ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीत पार पडली. यात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. जीएसटीचे चारऐवजी तीन स्लॅब करण्यात आले आहेत. १८ टक्क्यांचा स्लॅब ५ टक्क्यांवर आणल्याने आता खाद्यपदार्थ, किराणा साहित्य, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूपर्यंत जीएसटी कमी झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून याची अमलबजावणी होणार आहे.

LPG Gas Cylinder Price

जीएसटी कमी झाल्यानंतर खाद्यपदार्थ असो की, संबंधित वस्तू याचे दर कमी होणार आहेत, त्यामुळे केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणात एलपीची गॅसच्या किमती कमी होणार का.. हा सवाल ग्राहकांचा आहे. आपण या प्रश्नाचे उत्तर आणि इतर गोष्टी जाणून घेऊया.

केंद्र सरकारने नुकताच जीएसटी (GST) दरांमध्ये बदल केला असून, हे नवे दर २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू होत आहेत. या बदलांमुळे अनेक वस्तूंवरचा जीएसटी कमी झाला आहे, ज्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत. पण, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींवर याचा काही परिणाम होईल का?

घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरवर GST

घरगुती एलपीजी सिलेंडर (१४.२ किलो) आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (१९ किलो) यांच्यावर वेगवेगळे जीएसटी दर लागू होतात. नवीन दर लागू होण्यापूर्वी, घरगुती सिलेंडरवर ५% GST लागत होता, तर व्यावसायिक सिलेंडरवर १८% GST लागत होता. नवीन दर लागू झाल्यानंतरही हेच दर कायम राहणार आहेत.

घरगुती एलपीजी स्वस्त होईल का?

३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडरवरच्या जीएसटी दरात कोणताही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. याचा अर्थ, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलेंडरवर ५% जीएसटी दर कायम राहील (२.५% CGST + २.५% SGST). त्यामुळे, फक्त जीएसटीच्या बदलामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कोणतीही घट होणार नाही.

या किमती कशा ठरतात?

गॅस सिलेंडरच्या किमती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांवर आणि रुपयाच्या डॉलरच्या तुलनेत असलेल्या विनिमय दरावर अवलंबून असतात. त्यामुळे, जर सरकारने किंवा तेल कंपन्यांनी कोणताही दर बदल जाहीर केला नाही, तर जीएसटीमधील बदलामुळे किमतीवर परिणाम होणार नाही.

सध्या एलपीसी सिलिंडरचे भाव कमी होणार का?

सध्या दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत ₹८५३ आहे आणि ती स्थिर आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर दर महिन्याच्या १ तारखेला निश्चित होतात, पण त्यावरही जीएसटीचा परिणाम होणार नाही. जीएसटी दरातील बदलामुळे साबन, टूथपेस्ट, शॅम्पू आणि इतर एफएमसीजी वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी, तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात होणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+