Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LPG cylinder prices : एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी खूशखबर, ताजे दर तपासा

LPG cylinder prices reduced by Rs 33 today : ऑगस्ट महिन्यातील आजचा पहिला दिवस एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, आज १ ऑगस्ट २०५ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत.

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किमती जाहीर करत असतात. यामध्ये कधी गॅस सिलिंडरचे भाव कमी तर कधी जास्त होतात. यावेळी मात्र गॅस सिलिंडरच्या किमती अपेक्षेप्रमाणे कमी झाल्या आहेत.

LPG cylinder prices

किती झाले आता एलपीजी गॅस सिलिंडरचे भाव

१ ऑगस्ट २०२५ रोजी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६३१.५० रुपये झाली आहे, जी आधी १६६५ रुपये होती.

प्रमुख शहरांमधील व्यावसायिक सिलेंडरचे नवीन दर (१९ किलो)

  • दिल्ली: रु. १६३१.५०
  • मुंबई: रु. १५८३.००
  • कोलकाता: रु. १७३५.५०
  • चेन्नई: रु. १७९०.००

जुलैमध्येही घटले होते दर

जुलै महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची कपात झाली होती. हे नवे दर आजपासून (१ ऑगस्ट २०२५) लागू झाले आहेत.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झाला का?

१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील १४.२ किलो घरगुती सिलेंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: रु. ८५३.००

मुंबई: रु. ८५२.५०

पुणे: रु. ८५६.००

गुरुग्राम: रु. ८६१.५०

अहमदाबाद: रु. ८६०.००

जयपूर: रु. ८५६.५०

पटना: रु. ९४२.५०

आग्रा: रु. ८६५.५०

मेरठ: रु. ८६०.००

गाझियाबाद: रु. ८५०.५०

इंदूर: रु. ८८१.००

भोपाळ: रु. ८५८.५०

लुधियाना: रु. ८८०.००

वाराणसी: रु. ९१६.५०

लखनौ: रु. ८९०.५०

हैदराबाद: रु. ९०५.००

बेंगळुरू: रु. ८५५.५०

घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरमध्ये फरक काय?

घरगुती सिलिंडर

  • घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर (एलपीजी किंमत) घरगुती सिलेंडरचा आकार साधारणपणे १४.२ किलो असतो. तो घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस हीटरमध्ये आणि ग्रामीण भागात प्रकाशयोजनासाठी एलपीजी दिव्यांमध्ये वापरला जातो.
  • घरगुती एलपीजी सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते.
  • घरगुती सिलिंडरसाठी सुरक्षा मानके वेगळी आहेत आणि ती घरगुती उपकरणांसह सुरक्षितपणे वापरली जातात.
  • घरगुती एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सी आणि डिलर्सकडून सहज उपलब्ध आहे आणि ग्राहक घरी बसून ते ऑर्डर करू शकतो.
  • घरगुती सिलिंडर बुकिंग ऑनलाइन, गॅस एजन्सींद्वारे किंवा मोबाईल App द्वारे करता येते.

व्यावसायिक सिलिंडर

  • व्यावसायिक गॅस सिलिंडर साधारणः १९ किलोंचा असतो.
  • हा सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरता येतो.
  • व्यावसायिक कामांसाठी म्हणजेच हाॅटेल, मेस, आणि विविध मिष्ठान्न आणि खाद्यपदार्थाच्या दुकानात हा सिलिंडर वापरला जातो.
  • व्यावसायिक कामांसाठी घरगुती सिलिंडर वापरण्यास बंदी आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+