Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आजपासून देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग! खिशाला झळ! जाणून घ्या काय आहेत दर

LPG Cylinder Price: LPG सिलेंडरची किंमत देशभरात आजपासून महागणार आहेत. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे. तर 14 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

नवीन किमती आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येही एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या होत्या.

LPG Cylinder Price

दिल्लीमध्ये 1691.50 किमतीला सिलेंडर

ऑगस्ट महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1652.50 रुपये झाली. पण आजच्या वाढीनंतर दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1691.50 रुपये झाली आहे.

कोलकाता-चेन्नईमधील दर

इंडियन ऑइल कंपनी (IOCL) नुसार, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. नवीन किंमती लागू झाल्यानंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कोलकात्यात 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपयांवरून 1855 रुपयांपर्यंत वाढली आहे.

राजस्थानमध्ये सिलिंडर फक्त 450 रुपयांना

एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे राजस्थान सरकारने 68 लाख कुटुंबांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. येथे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना 1 सप्टेंबरपासून 450 रुपयांचे घरगुती गॅस सिलिंडर मिळतील. याचा थेट फायदा 68 लाख कुटुंबांना होणार आहे. या योजनेचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, बीपीएल आणि उज्ज्वला कनेक्शनधारकांना मिळणार आहे.

या लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये 1 कोटी 7 लाखाहून अधिक NFSA कुटुंबे आणि सुमारे 70 लाख उज्ज्वला आणि BPL कनेक्शनधारक आहेत, जे आधीच अनुदानित सिलिंडरचा लाभ घेत आहेत.
तेल कंपन्यांच्या मते, राजस्थानमध्ये 1 कोटी 75 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. सध्या, 14.5 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 806.50 रुपये आहे, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1680 रुपये आहे.

जुलैमध्ये किंमती झाल्या होत्या कमी

जुलैमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. या कपातीमुळे दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली, ज्यामुळे त्याची किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपयांवर आली. जुलैमधील कपातीचा परिणाम इतर शहरांवरही झाला आणि कोलकात्यात किंमत 1787 रुपयांवरून 1756 रुपयांपर्यंत घसरली, चेन्नईमध्ये किंमत 1840.50 रुपयांवरून 1809.50 रुपये आणि मुंबईत 1629 रुपयांवरून 1598 रुपयांपर्यंत घसरली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+