Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LIC News: तुमच्या LICचा हप्ता भरायचा राहिलाय का, चिंता करू नका, एलआयसीने केली ही खास सुविधा

LIC Offices To Remain Open On March Weekend : नव्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर एलआयसीने पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीचे हप्ते भरता यावेत यासाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार आणि ईदची सुटी असलेल्या सोमवारीही एलआयसीच्या देशभरातील कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एलआयसी धारकांना हप्ता भरण्याची चिंता नाही, ते सुट्टीच्या दिवशीही जाऊन त्यांचा प्रीमियम भरून आर्थिक भुर्दंडापासून मुक्त होऊ शकता.

LIC News

ही तीन दिवस कार्यालये खुली राहणार

आर्थिक वर्ष संपत असल्याने पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीचे हप्ते भरता यावेत, यासाठी एलआयसीच्या झोन आणि विभागांच्या अखत्यारीतील एलआयसीची कार्यालये 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी अधिकृत कामकाजाच्या वेळेनुसार खुली राहतील, असे विमा कंपनी एलआयसीने एका निवेदनाद्वारे सांगितलेले आहे.

शासकीय सुट्टीच्या दिवशीही कार्यालय राहणार खुली

दरम्यान सुट्ट्यांच्या दिवशीही एलआयसीची कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने 12 मार्च 2025 रोजी जारी केलेल्या सल्ल्यानुसार घेण्यात आल्याचे, एलआयसीच्या निवेदनात म्हटले आहे.

बँका देखील कार्यरत राहतील

रिझर्व्ह बँकेने 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व बँकांना 31 मार्च रोजी खुले राहण्याचे आदेश दिले होते. आरबीआयने सर्व एजन्सी बँकांना 31 मार्च म्हणजेच रविवारी खुले राहण्याचे आदेश दिले होते.

एजन्सी बँकांमध्ये 12 सरकारी बँकांसह एकूण 33 बँकांचा समावेश आहे. यामध्ये एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यासह सर्व प्रमुख बँकांचा समावेश आहे.

आयकर विभागाचे कार्यालयही सुरू राहील

2024-25 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने, बँका आणि एलआयसी कार्यालयांप्रमाणे, आयकर विभागाची कार्यालये देखील 29 ते 31 मार्च रोजी खुली राहतील. अशा परिस्थितीत, करदाते चालू आर्थिक वर्षाशी संबंधित कोणतेही काम शनिवार आणि रविवारी पूर्ण करू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+