चिंता सोडा! LICची ही एकच योजना अन् संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची सुरक्षा, जाणून घ्या लाभ कसा घ्यायचा
सद्याच्या काळात अचानक उद्भवणारे आजार आणि रुग्णालयांचा वाढलेला खर्च पाहता, आरोग्य विमा (Health Insurance) असणे ही काळाची गरज बनली आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या गंभीर आजारपणामुळे किंवा अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडून पडू शकते.
अशा परिस्थितीत, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय घेऊन आले आहे: 'एलआयसी जीवन आरोग्य' पॉलिसी. या योजनेतून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकता. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि आर्थिक बाजू देखील व्यवस्थित राहिल. चला तर या योजनेविषयी संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊया..!

एकाच पॉलिसीमध्ये कुटुंबाची संपूर्ण सुरक्षा
'एलआयसी जीवन आरोग्य' ही एक अशी आरोग्य विमा पॉलिसी आहे, जी फक्त तुमचीच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा करते. या एकाच पॉलिसीमध्ये तुम्ही तुमच्या पत्नी, मुले, पालक आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येक सदस्यासाठी वेगळी पॉलिसी घेण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे व्यवस्थापन सोपे होते आणि कुटुंबाला एकाच छत्राखाली आर्थिक संरक्षण मिळते. जेव्हा कुटुंबातील कोणताही सदस्य रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा ही पॉलिसी उपचाराचा खर्च उचलून आर्थिक ताण कमी करते.
पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे
वयोमानानुसार प्रीमियम
या पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या वयानुसार ठरवला जातो. सुरुवातीच्या वर्षांमध्ये प्रीमियम कमी असतो, आणि वय वाढल्यावर तो थोडा वाढतो. उदा. २० वर्षांच्या व्यक्तीसाठी वार्षिक प्रीमियम सुमारे ११,९२२ रुपये असेल, तर ५० वर्षांच्या व्यक्तीसाठी तो १३,७६८ रुपये असतो.
तातडीची आर्थिक मदत
रुग्णालयात दाखल झाल्यावर बिलाची प्रत सादर केल्यावर उपचाराच्या एकूण खर्चाच्या ५०% रक्कम लगेच दिली जाते, जेणेकरून तुम्हाला उपचारादरम्यान पैशांची चिंता राहणार नाही.
दैनिक लाभ
ही पॉलिसी रुग्णालयात दाखल झाल्यावर दररोज १,००० ते १४,००० रुपयांपर्यंतची रक्कम देते, जी तुम्ही जास्तीत जास्त ७२० दिवसांसाठी वापरू शकता. तुमची कव्हरेज जास्त असल्यास, तुम्हाला आयसीयूसाठी दररोज ८,००० रुपयांपर्यंतचा दावा मिळू शकतो.
रुग्णवाहिकेचा खर्च
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेचा खर्चही यामध्ये कव्हर होतो, ज्यासाठी १,००० रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
जलद दावा निवारण
गंभीर अपघात किंवा मोठी शस्त्रक्रिया झाल्यास, दावा एकाच दिवसात निकाली काढला जातो, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर आर्थिक मदत मिळते.
वर्षातून किती वेळा घेता येतो लाभ!
या पॉलिसीचा लाभ तुम्ही वर्षातून 5 वेळा घेऊ शकता. कमी प्रीमियम आणि व्यापक कव्हरेज यामुळे 'एलआयसी जीवन आरोग्य' पॉलिसी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी एक उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते, जी अनपेक्षित वैद्यकीय खर्चांपासून तुमचे संरक्षण करेल.












Click it and Unblock the Notifications