Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिलांना मिळणार महिन्याला 7 हजार रुपये! 'एलआयसीची विमा सखी योजना' काय आहे कसा घ्यावा लाभ जाणून घ्या

LIC Insurance Sakhi Scheme : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु आहे, प्रत्येक महिन्याला महिलांना दीड हजार रुपये मानधन मिळते, पण जर तुम्ही घरबसल्या कमाईचा मार्ग शोधत असाल तर लाडक्या बहि‍णींना महिन्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्ही एलआयसीच्या विमा सखी योजनेद्वारे मिळवू शकणार आहात, विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही. होय... विश्वास बसत नसेल पण ही योजना खास महिलांसाठी आणली आहे.

तुम्ही जर एक महिला असाल आणि घरबसल्या कमाईचा मार्ग शोधत असाल, तर भारतीय जीवन विमा निगम (LIC) तुमच्यासाठी एक अनोखी संधी घेऊन आले आहे. 'विमा सखी' या खास योजनेत सामील होऊन महिलांना दरमहा 7 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

LIC Insurance SaKHI Scheme

विमा सखी योजना काय आहे?

  • एलआयसीची विमा सखी योजना खास करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • या अंतर्गत, महिला एलआयसी एजंट म्हणून काम करतील आणि त्यांना कंपनीकडून पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
  • तुम्ही तुमच्या घरूनच काम करू शकता.

उत्पन्नाचा तपशील

'विमा सखी' म्हणून काम करणाऱ्या महिलांना ठराविक उत्पन्न दिले जाईल. हे उत्पन्न त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल आणि ते तीन वर्षांसाठी खालीलप्रमाणे असेल:

पहिल्या वर्षी: दरमहा ₹ 7,000

दुसऱ्या वर्षी: दरमहा ₹ 6, 000 (जर 65% पॉलिसी चालू राहिल्या तर)

तिसऱ्या वर्षी: दरमहा ₹ 5, 000 (काही अतिरिक्त अटींसह)

कोण अर्ज करू शकतो?

या योजनेचा लाभ खालील अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळेल

  • वय 18 ते 79 वर्षांदरम्यान असावे.
  • किमान 10 वी पास असावे.
  • ज्यांनी यापूर्वी कोणत्याही स्वरूपात एलआयसीसोबत काम केलेले नाही.

'या' महिलांना लाभ मिळणार नाही

  • ज्या महिला सध्या एलआयसी एजंट किंवा कर्मचारी आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य (पती, भाऊ, आई-वडील इ.) एलआयसीमध्ये काम करत आहे किंवा पूर्वी काम करत होता.
  • निवृत्त किंवा माजी एलआयसी एजंट देखील या योजनेसाठी पात्र नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील:
  • वयाचा पुरावा (उदा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड)

पत्त्याचा पुरावा

  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (किमान 10 वीची मार्कशीट)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सर्व कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित (self-attested) प्रती आवश्यक आहेत.

अर्ज कसा कराल?

या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेत जाऊन अर्ज करू शकता किंवा एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकता. तिथे तुम्हाला प्रशिक्षण आणि कामाची पद्धत समजावली जाईल.

ही योजना अशा महिलांसाठी एक उत्तम मार्ग आहे, ज्यांना घराबाहेर जाऊन नोकरी करणे शक्य नाही, पण त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे. 'बीमा सखी' बनून तुम्ही केवळ पैसेच कमावत नाही, तर तुमच्या आसपासच्या लोकांना विम्याबद्दल जागरूकही करू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+