क्रेडिट कार्डने पैसे भरणे महाग होणार! 1 जूनपासून नियम बदलणार, जाणून घ्या काय काय होणार बदल
Kotak mahindra bank credit card new rules : महिन्याचा प्रत्येक पहिला दिवस हा बदलांचा असतो. यादिवशी पेट्रोल -डिझेल ते गॅस सिलिंडर अन् बँकिंग सेवेतही बदल होत असतात. आता आगामी १ जूनपासून क्रेडिटकार्डसंबंधीत एक मोठी अपडेट आली आहे.
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. १ जून २०२५ पासून, बँक त्यांच्या कार्डशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहेत.
कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डसंबंधीत ही बातमी असून यामुळे तुमच्या क्रेडिटकार्डच्या बिल पेमेंट, रिवॉर्ड पॉइंट्स आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर परिणाम होईल. नेमका काय बदल होणार याबाबत आपण जाणून घेऊया.
ऑटो डेबीट - जर तुम्ही सेट केलेले ऑटो-डेबिट अयशस्वी झाले तर शुल्क आकारले जाईल.

- जर तुमचे क्रेडिट कार्ड बिल ऑटो-डेबिटद्वारे कापले गेले नाही, तर बँक आता दोन टक्क्यांपर्यंत शुल्क आकारेल. हे शुल्क किमान ४५० रुपये असेल.
- अशा परिस्थितीत वेळेवर पेमेंट करणे आवश्यक झाले आहे, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात आणि खिशालाही फटका बसू शकतो.
- युटिलिटी बिलांवर शुल्क भरावे लागेल.
- आता जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून वीज, पाणी किंवा गॅस सारखी युटिलिटी अर्थात उपयोगाची बिलं भरली आणि ती एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली तर त्यावर १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे.
कुणाला लागू होणार नाहीत हे नियम?
वरील नियम कोटक व्हाईट रिझर्व्ह, सॉलिटेअर, इन्फिनिटी, सिग्नेचर आणि मिंट्रा कार्ड्स सारख्या निवडक कार्ड्सना लागू होणार नाहीत. उर्वरित कार्डधारकांनी मात्र सतर्क राहण्याची गरज आहे, यामुळे अनावश्यक शुल्क टाळता येईल.
क्रेडिटकार्डने पेट्रोल - डिझेल खरेदी केले तर काय होणार?
क्रेडिटकार्डद्वारे जर पेट्रोल आणि डिझेल तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त खरेदी केले तर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. आता इंधनावर निश्चित रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास १ टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. इंडियन ऑइल कोटक कार्ड आणि काही प्रीमियम कार्ड या नियमातून वगळण्यात आले आहेत.
परदेशात चलन बदल केला तर काय...
जर तुम्ही परदेशात प्रवास केला किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार केला तर आता डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) वर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. तसेच, शिक्षणाशी संबंधित पेमेंटवर नवीन शुल्क आकारले जाऊ शकते, ज्याची माहिती बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकवर काय होणार परिणाम?
बँकेने काही श्रेणींमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स देण्याचे नियम बदलले आहेत. तसेच कॅशबॅक रिडेम्पशनचे मूल्य देखील कमी केले आहे. त्यामुळे खर्च करताना नियम पडताळून पाहावे लागणार आहेत.












Click it and Unblock the Notifications