सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ - उतार; आज काय आहेत दर?

मुंबईः भारतीय सोने - चांदीकडे एक उत्तम गुंतवणुकीचा मार्ग म्हणून पाहतात. या सोने - चांदीच्या दरात सातत्याने चढ - उतार पाहायला मिळतो. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे.

आज मंगळवार, 02 जुलै महिन्याच्या दुसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव

gold silver price 2nd july

10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आज रुपये 71,850 इतकी आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 71,770 वर बंद झाली होती. रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 89,770 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 89,460 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. देशातील वेगवेगळ्या शहरांत या किमतींमध्ये तफावत पाहायला मिळते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक? सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला 22 कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, 24 कॅरेटचे? कारण अश्या 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे आणि इतर धातू मिक्स केले जातात, करून त्यामुळे सोन्याला मजबुती येते.

त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर याबाबत माहिती असणे जरुरी आहे.

24 कॅरेट सोने 99.9 % शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

भारतात लग्नसराई आणि दिवाळीच्या काळामध्ये अधिकची सोने खरेदी होते. त्यामुळे या काळात सोन्याचे दर एकदम उच्चांकी पातळीवर पोहोचलेले असतात. त्यामुळे इतर उर्वरित काळात सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहत असतात.

बिकट काळात सोने आणि चांदी मोठी गुंतवणूक म्हणून समोर येते. यामध्ये निश्चितपणे गुंतवणूक दाराना फायदा होतो. कोरोना काळानंतर भारतात सोने आणि चांदीने मोठी उच्चांकी पातळी गाठली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+